पाणीपुरी विक्रेत्याचा गाडा उलटवला, स्वच्छतागृहातील टाकीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 10:55 AM2020-11-07T10:55:16+5:302020-11-07T11:01:36+5:30
Rankala, food, kolhapurnews रंकाळा तलाव येथील पाणीपुरी व्यावसायिकाने स्वच्छतागृहाजवळील टाकीतील पाणी आणून ग्राहकांना पिण्यासाठी ठेवल्याचा व्हीडिओ शुक्रवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे पडसाद सायंकाळी उमटले. त्या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याचा गाडा अज्ञात तरुणांनी शुक्रवारी रात्री उलटविला.
कोल्हापूर : रंकाळा तलाव येथील पाणीपुरी व्यावसायिकाने स्वच्छतागृहाजवळील टाकीतील पाणी आणून ग्राहकांना पिण्यासाठी ठेवल्याचा व्हीडिओ शुक्रवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे पडसाद सायंकाळी उमटले. त्या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याचा गाडा अज्ञात तरुणांनी शुक्रवारी रात्री उलटविला.
खराडे कॉलेजसमोरील रंकाळा तलाव परिसरातील पाणीपुरी व्यावसायिकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. महापालिकेच्या स्वच्छतागृहावरील टाकीतील पाणी ग्राहकांना पिण्यासाठी ठेवले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्याची माहिती समजातच अज्ञात तरुणांनी तेथे येऊन त्याच्याजवळील पाणी रस्त्यावर फेकले. पाणीपुरीचाही रस्त्यावर खच साचला होता. अचानक गोंधळ उडाल्याने याठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलिसांत झाली नव्हती.