पानसरे प्रकरणाची सुनावणी २० जूनला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:04 AM2019-04-21T05:04:31+5:302019-04-21T05:05:09+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे.

Pansare case hearing on June 20 | पानसरे प्रकरणाची सुनावणी २० जूनला

पानसरे प्रकरणाची सुनावणी २० जूनला

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जूनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. सुनावणीसाठी संशयित आरोपी समीर गायकवाड, त्याचे वकील समीर पटवर्धन न्यायालयात हजर होते.

पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. कोल्हापूर एसआयटी, कर्नाटक एसआयटी आणि सीबीआय असा तिघांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. या हत्येप्रकरणी काही संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे हा खटला चालविण्यात यावा, असे अपील संशयित आरोपींच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केले होते; परंतु तपास अधिकारी तिरूपती काकडे यांनी पानसरे हत्येप्रकरणी तपास सुरू आहे. फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार, सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी यांचा शोध सुरू आहे. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा खटला लगेच सुरू करू नये, तपासाला आणखी काही दिवस अवधी द्यावा, अशी विनंती केली आहे.

‘त्या’ दोघांचा सुगावा नाही
या प्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय पवार व सारंग अकोळकर यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपास यंत्रणेला अद्यापही या दोघांचा सुगावा लागलेला नाही. मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून हे दोघे फरार आहेत.

Web Title: Pansare case hearing on June 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.