'आता पानसरे यांच्या खुनाचाही छडा लागेल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:38 AM2018-08-19T02:38:48+5:302018-08-19T02:40:00+5:30

दाभोलकरांच्या मारेकऱ्याच्या अटकेनंतर मेघा पानसरेंनी व्यक्त केला विश्वास

'Pansare's murder must be punished' | 'आता पानसरे यांच्या खुनाचाही छडा लागेल'

'आता पानसरे यांच्या खुनाचाही छडा लागेल'

Next

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला तब्बल पाच वर्षांनी का होईना, अटक झाली आहे. आता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाचाही छडा लागेल, असा विश्वास पानसरे यांच्या स्नुषा मेघा यांनी शनिवारी व्यक्त केला.
डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला सीबीआयने औरंगाबादमधून अटक केली. या प्रकरणी आपले मत मांडताना मेघा पानसरे म्हणाल्या, ‘‘डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागण्यासाठी पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे अनेकदा मनात निराशाही दाटून आली. पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ््या खून होतो आणि मारेकरी सापडत नाहीत, हेच मनाला पटत नव्हते. परंतु, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी कर्नाटक पोलीस हे जाळे भेदू शकले. त्यामुळे आरोपींना अटक झाली.’’

Web Title: 'Pansare's murder must be punished'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.