‘पपई’ची लागवड उत्पन्नाचा नवा माग

By Admin | Published: February 3, 2015 12:20 AM2015-02-03T00:20:22+5:302015-02-03T00:28:45+5:30

दोन वर्षांचे पीक : आंतरपिकाचाही नफा; दुसऱ्या वर्षी किमान सव्वा लाख रुपये निव्वळ उत्पर्न्न

Papaya plantation new revenue stream | ‘पपई’ची लागवड उत्पन्नाचा नवा माग

‘पपई’ची लागवड उत्पन्नाचा नवा माग

googlenewsNext

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात तसे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अग्रेसर आहेत. अल्पभूधारक असो वा अल्प पाण्याचे क्षेत्र असो, जमिनीची प्रत आणि उपलब्ध परिस्थितीचा फायदा घेत पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यात निष्णात आहेत. पपईची लागवड हाही एक प्रयोग होय. करवीर तालुक्यातील आरे येथील अनिल रघुनाथ पाटील यांनी मित्र महेश चौगले-साळोखे यांच्या सल्ल्यानुसार पपईची लागवड करून दोन वर्षांत रगड उत्पन्न मिळविण्याचा मार्ग अवलंबला आहे.शेतीमध्ये नवीन काही करण्याच्या जिद्दीने खासगी कंपनीतील नोकरी सोडून अनिल पाटील यांनी पपईची लागवड केली. त्यांना वडील ‘भोगावती’चे माजी वरिष्ठ लिपिक आर. वाय. पाटील, आई इंदुबाई, पत्नी गायत्री, तर भाऊ धनंजय, भावजय स्वप्नाली यांनी मोलाची मदत केली. १५ गुंठे शेतजमिनीत ट्रॅक्टरने दोनवेळा नांगरट केली. तीन ट्रॉल्या शेणखत टाकले व पावणेचार फूट अंतराने सरी सोडली. १५ जानेवारी २०१४ रोजी पेरणी करून मे २०१४ ला अंतरपिकातून भुईमुगाचे तीन क्विंटल उत्पन्न घेतले. मोहोळ (जि. सोलापूर) येथील नर्सरीतून ३८० पपईची रोपे आणली. वाहतुकीसह एक रोप १४ रुपयांना पडले. मार्च २०१४ मध्ये भुईमुगाचे आंतरपीक असताना पपईची लागवड केली. त्यानंतर ‘ग्रो’ जैविक खताची आळवणी दर १५ दिवसांनी तीनवेळा केली. तसेच वारणा सेंद्रिय खताची दोन पोती वापरली. दर महिन्याला ‘डीएपी’चे एक पोते व सूक्ष्म अन्नद्रव्याची दोन पोती खते वापरली. आंतरमशागत, पाण्याचा फेर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी, तर थंडीमध्ये १२ दिवसांनी देत असून, सरीमध्ये पाट पाण्याची पद्धती आहे. पाच महिन्यांनंतर पपईची भरणी केली. भरणीनंतर पपईची उंची पाच ते सहा फुटांपर्यंत जाते. दर पंधरा दिवसांनी फोर्स व सिबुस या कीटकनाशकांची फवारणी केली.
साधारणत: सव्वा लाखाचे उत्पन्न खात्रीशीर मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांना त्यांचे बंधू कृषी अधिकारी एम. डी. पाटील (आरे) यांचे मार्गदर्शन लाभले.
- मधुकर डाफळे ल्ल कोगे

Web Title: Papaya plantation new revenue stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.