शेकडो वर्षे अखंडित सेवेत महागावचा परशुराम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:45+5:302021-06-02T04:19:45+5:30

रमेश भोसले महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेला परशुराम तलाव गावचा मानबिंदू समजला जातो. शेकडो वर्षे ...

Parashuram Lake of Mahagaon in uninterrupted service for hundreds of years | शेकडो वर्षे अखंडित सेवेत महागावचा परशुराम तलाव

शेकडो वर्षे अखंडित सेवेत महागावचा परशुराम तलाव

Next

रमेश भोसले

महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेला परशुराम तलाव गावचा मानबिंदू समजला जातो. शेकडो वर्षे महागावकरांची तहान या तलावाने भागविली आहे. तलावाला पाणीपुरवठा करून तलाव भरणाऱ्या पाटालाही शेकडो वर्षांच्या इतिहासासह अनन्यसाधारण महत्त्व आहे.

परशुराम तलावाचे क्षेत्र सुमारे सहा एकरात विखुरले आहे. या तलावाचे बांधकाम केव्हा झाले याची ठोस माहिती उपलब्ध नाही. तरीही चारशेहून अधिक वर्षांचे तलावाचे वयोमान असावे असा अंदाज वयोवृद्ध लोकांकडून वर्तवला जातो. १९७२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात तलाव कोरडा पडला होता.

लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तलावाचे गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेला गाळ तलावाच्या काठावर टाकण्यात आला. या गाळात रायगडवरील बाजारपेठेची आठवण करून देणारे दगड आणून बसविण्यात आले. त्याठिकाणी बाजारही भरत होता. मात्र, काळाच्या ओघात ही याठिकाणी मातीचा ढीग साचत जाऊन बाजारकट्टे मातीत गाडले गेले आहेत. या तलावामुळे गावाला पाणीटंचाईला सामोर जावे लागले नाही. तलाव बांधतानाच पाट बांधून तलाव पाण्याने भरण्याचे नियोजन करण्यात आले होते. गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील चव्हाण भागातील ओढ्यावर बांध घालून पाणी अडविण्याची योजना आहे. येथे तुंबून राहणारे पाणी पुढे पाटाने परशुराम तलावात येते. दोन किलोमीटर अंतराचा हा पाट दरवर्षी झाडे, झुडपे, वेली, माती यात बुडून जातो.

पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतीला स्वच्छता मोहीम हाती घ्यावी लागते. यात ग्रामस्थांसह तरुण मंडळाचे कार्यकर्ते श्रमदान करून आपले योगदान देतात. रामतीर्थ डोंगरावरून पाण्याचा मोठा प्रवाह ओढ्यात येतो. तेथून याच पाटाने परशुराम तलावात येते. १५ ऑगस्टपर्यंत तलाव ओसंडून वाहू लागतो. तलावातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर शेकडो एकर भातशेती क्षेत्र ओलिताखाली येते. या पाटाला मजबूत आरसीसी बांधकामाची गरज आहे. याला निधीही मोठा लागणार आहे. या निधीसाठी दरवर्षी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांच्याकडून पाठपुरावा सुरू असतो. पण, अद्याप त्याला यश मिळाले नाही.

-------------------

फोटो ओळी : महागाव (ता.गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून तहान भागविणारा परशुराम तलाव आणि तलावात पाणी अडविण्यासाठी बांधलेला बांध असा झाडे, झुडपे व गाळाने भरला आहे. (बागवान फोटो)

क्रमांक : ०१०६२०२१-गड-०३/०४

Web Title: Parashuram Lake of Mahagaon in uninterrupted service for hundreds of years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.