बिद्री महाविद्यालयाचे छत कोसळल्याप्रकरणी पालक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:23+5:302021-08-29T04:25:23+5:30
शुक्रवारी नववीच्या वर्गातील छताचा काही भाग मुलांच्या अंगावर पडला. यामध्ये तिटवे येथील दोन मुले जखमी झालीत. शिक्षकांनी त्यांना घरी ...
शुक्रवारी नववीच्या वर्गातील छताचा काही भाग मुलांच्या अंगावर पडला. यामध्ये तिटवे येथील दोन मुले जखमी झालीत. शिक्षकांनी त्यांना घरी घालवले रात्री मुलांनी ही माहिती पालकांनी सांगितली. शनिवारी पालक शाळेत गेले असता पुन्हा त्याच वर्गात मुलांना बसवले होते, यावेळी पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्राचार्य आर.व्ही. पाटील म्हणाले, शुक्रवारी मी बाहेर होतो संध्याकाळी मला ही घटना समजली. आज संचालक मंडळाला ही माहिती दिली जाणार आहे. शाळेचा फक्त राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप पालकांनी केला. एक महिन्याच्या आत शाळेची दुरुस्ती करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा अजित पोवार, पांडुरंग पाटील, धनाजी पाटील, दत्तात्रय पाटील, इंद्रजीत भारमल आणि इतर पालकांनी दिला.