लग्नाच्या विचारात आहात, मग यायला लागतंय; कोल्हापुरात शनिवारी मराठा वधू-वर पालक मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:27 PM2022-05-09T18:27:08+5:302022-05-09T18:27:39+5:30
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी (दि. १४ मे) सकाळी ११ ते २ या वेळेत राजर्षी ...
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी (दि. १४ मे) सकाळी ११ ते २ या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मराठा वधू-वर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. नियोजित वधू-वर व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले यांनी केले आहे.
हल्ली मराठाच नव्हे सर्वच समाजात मुला-मुलींचे लग्न जमविणे हे जिकिरीचे होऊन बसले आहे. पूर्वी नात्यातून स्थळे येत होती, ती पद्धत आता बऱ्याचअंशी बंद झाली आहे. पै-पाहुण्यांना वेळ मिळत नाही. आणि खासगी वधूवर केंद्राकडून पालकांची लूट केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर अशा समाजाकडूनच आयोजित केलेल्या वधूवर मेळाव्यांची चांगली मदत होत आहे. प्रत्येकवेळी या वधूवर मेळाव्यास उपस्थित राहून लग्न जमण्याचे प्रमाणही वाढत आहे. नाममात्र शुल्कात थेट मुला-मुलींना पाहण्याची संधीच या मेळाव्यात उपलब्ध होते. त्यात पसंती झाल्यास पुढे जाऊन प्रत्येकाने सोयरिक करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु प्राथमिक माहितीसाठी या मेळाव्याचा चांगला उपयोग होत असल्याच्या समाजातील पालकांच्या प्रतिक्रिया आहेत.