महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी परेश भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:30 AM2021-08-18T04:30:08+5:302021-08-18T04:30:08+5:30
परेश भागवत रुजू लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून परेश भागवत यांनी मंगळवारी पदभार ...
परेश भागवत रुजू
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून परेश भागवत यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते ‘प्रकाशगड’ मुख्यालयात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते.
मुख्य अभियंता म्हणून प्रभाकर निर्मळे हे मे महिन्यात सेवानिवृत्त झाल्यापासून गेले तीन महिने हे पद रिक्त होते.
भागवत हे पाचगाव (ता. करवीर)चे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत आभियांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली आहे. वित्त व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.
ते १९९७ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. रत्नागिरी परिमंडळातील कुडाळ विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांनी १९९९ ते २००६ या कालावधीत कोल्हापूर शहर व ग्रामीण विभागांत सेवा बजाविली आहे. ऑगस्ट २००६ मध्ये सरळसेवेने त्यांची निवड कार्यकारी अभियंता या पदावर झाली. रत्नागिरी परिमंडळात नवनिर्मित खेड विभागाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. २००७ ते २०११पर्यंत ते भिवंडी येथील टोरंटो पॉवर डिस्ट्रिब्युशन फ्रँचाईजीत साहाय्यक महाव्यवस्थापक या पदावर ते प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी जानेवारी २०१२ ते जुलै २०२१ या कालावधीत कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता या पदांवर महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयात विविध विभागांची जबाबदारी पार पाडली आहे.
फोटो: १७०८२०२१-कोल- परेश भागवत