जोतिबा यात्रेकरुंसाठी पार्किंगची व्यवस्था

By Admin | Published: April 4, 2017 05:35 PM2017-04-04T17:35:11+5:302017-04-04T17:35:11+5:30

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांचे आवाहन

Parking arrangement for Jyoti pilgrims | जोतिबा यात्रेकरुंसाठी पार्किंगची व्यवस्था

जोतिबा यात्रेकरुंसाठी पार्किंगची व्यवस्था

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रा दि. ८ ते १० एप्रिल या कालावधीमध्ये साजरी होत आहे. यात्राकाळात राज्यातून व परराज्यांतून लाखो भाविक खासगी व सार्वजनिक वाहनांनी डोंगरावर येत असतात. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गांवर वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या काळात घाटामध्ये अत्यावश्यक वाहनांना वगळून एकेरी वाहतूक, मोटार वाहनांना प्रवेश बंदी, मार्ग वळविणे, नो पार्किंग, हॉल्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनचालक व भाविकांनी वाहतूक नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी केले आहे.

यात्रेकरीता जाणारी सर्व वाहने केर्ली व कुशिरे फाटामार्गे जोतिबा डोंगरावर जातील व इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. केर्ली-कुशिरे गावावरून येणारी सर्व मोटार वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुखमार्गे जोतिबावर जातील. सर्व एस. टी. बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने सामाजिक वनीकरण येथून दानेवाडीमार्गे जोतिबावर जातील. घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने दानेवाडी फाट्यावरून वाघबिळ किंवा गिरोलीमार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी एक दिशामार्गे जातील.

जोतिबा ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गांनी राहील. देवदर्शन घेऊन परत जाणाऱ्या वाहनचालकांनी गिरोली बाजूकडील एक दिशा मार्गाचा अवलंब करावा. वाघबिळ व शाहूवाडीकडून दानेवाडीमार्गे येणारी सर्व वाहने केर्लीमार्गे जोतिबावर जातील. माले, कोडोली, गिरोली, वाघबिळ हे मार्ग फक्त बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. यामार्गे वाहनांना जोतिबावर जाण्यास प्रवेश बंदी आहे.

भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी भाविकांनी डोंगरावर ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. खासगी वाहनांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांनी भाविकांना डोंगरावर सोडून आपली वाहने पन्हाळा डोंगरावरील उपलब्ध पार्किंग, केर्ली गावातील माळरान व हायस्कूल मैदान तसेच रजपूतवाडी-सोनतळी मैदान आदी ठिकाणी पार्किंग करावी. भाविकांनी व वाहनधारकांनी गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तांबडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)

अवजड वाहनांना ‘प्रवेश बंदी’

अवजड वाहने, ट्रक, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्टर यांना यात्रा कालावधीत जोतिबावर जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.

Web Title: Parking arrangement for Jyoti pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.