पार्लेत ‘स्वाभिमानी’ने रोखली ऊसतोड-फडात घुसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:27 AM2017-10-31T00:27:40+5:302017-10-31T00:32:36+5:30
कºहाड : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना दिला होता
कºहाड : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना दिला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी कºहाड तालुक्यातील काही गावांत ऊसतोड सुरू केली. त्यामुळे अगोदर उसाचा हप्ता जाहीर करा, मगच कोयता लावा, असे सांगत सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पार्ले येथे सुरू असलेली ऊसतोड फडात जाऊन बंद पाडली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानीचे नेते अनिल घराळ, कºहाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम, आदींची उपस्थिती होती.
कºहाड तालुक्यातील पार्ले येथे कारखान्यातील टोळीकडून ऊसतोड सुरू करण्यात आलीअसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोमवारी सकाळी मिळाली.
त्यानंतर ते पार्ले येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असलेल्या फडात गेले. कारखान्यांकडून उसाचा पहिला हप्ता जाहीर झाला नसताना कशी काय ऊसतोड सुरू केली? अशी विचारणा त्या ठिकाणी असलेल्या कारखान्यांच्या टोळीमालकांना केली. जोपर्यंत कारखान्यांकडून पहिला हप्ता जाहीर केला जात नाही, तोपर्यंत उसाची एकही कांडी तोडू नये, असे सांगत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. जिल्ह्यासह तालुक्यातील कारखान्यांचा टोळ्या ऊसतोड करण्यासाठी कºहाड तालुक्यात दाखल झाल्या आहेत. पहिला हप्ता कारखान्यांनी ३४०० जाहीर करावा, अन्यथा एकाही कारखान्याच्या टोळीस ऊसतोड करू देणार नाही. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्या अनुषंगाने सोमवारी पार्ले कारखाना टोळ्यांकडून सुरू असलेली ऊसतोड संघटनेच्या पदाधिकाºयांनी बंद पाडली.
कारखान्यांनी शेतकºयांना चांगला ऊसदर द्यावा, अशा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. शेतकºयांनीही या आंदोलनास पाठिंबा द्यावा. त्यांनी जोपर्यंत कारखान्यांकडून पहिला हप्ता योग्य प्रकारे दिला जात नाही, तोपर्यंत आपल्या उसाची तोड करू देऊ नये व स्वाभिमानीच्या आंदोलनास सहकार्य करावे. कारण हे आंदोलन सर्वसामान्य शेतकºयांच्या हितासाठी करण्यात येत आहे.
- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातार
जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची पहिली ठिणगी
उसाचा पहिला हप्ता ३४०० रुपये कारखान्यांनी जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्यापही संघटनेची मागणी मान्य केलेली नाही. अशात सोमवारी कºहाड तालुक्यातील पार्ले परिसरात कारखान्यांनी ऊसतोड सुरू केल्याने त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी कºहाड तालुक्यातून पडली असल्याचे यावेळी दिसले.