पर्रीकर यांचे कोल्हापूर, आजऱ्याशी ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:29 AM2019-03-18T00:29:25+5:302019-03-18T00:29:32+5:30

कोल्हापूर : दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे कोल्हापूर आणि आजरा शहरांशी ऋणानुबंध होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींचा उजाळा मिळत ...

Parrikar's relationship with Kolhapur, Ajara | पर्रीकर यांचे कोल्हापूर, आजऱ्याशी ऋणानुबंध

पर्रीकर यांचे कोल्हापूर, आजऱ्याशी ऋणानुबंध

Next

कोल्हापूर : दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे कोल्हापूर आणि आजरा शहरांशी ऋणानुबंध होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींचा उजाळा मिळत आहे. कोल्हापुरातील अनेक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली होती.
भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांचे आणि पर्रीकर यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे प्रत्येक कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांची भेट ठरलेली असे. रविवार पेठेतील ‘अभाविप’चे कार्यकर्ते शशांक देशपांडे यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. देशपांडे हे गोव्यामध्ये ‘अभाविप’चे पूर्णवेळ प्रचारक म्हणून दोन वर्षे होते. तेव्हापासून पर्रीकरांचे त्यांच्याशी संंबंध आले. त्यामुळे त्यांनी देशपांडे यांच्या व्यवसायातही सहकार्य केले. त्यांच्या घरी तीन वेळा ते आले होते.
महालक्ष्मी बॅँकेच्या कार्यक्रमात पर्रीकर आले होते. पंचगंगा बॅँकेच्या देवकर पाणंद शाखेचे उद्घाटन पर्रीकर यांच्या हस्ते झाले; तर कृष्णराव सोळंकी यांच्या अमृतमहोत्सवासाठीही पर्रीकर यांनी उपस्थिती लावली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मुस्कान लॉनवर त्यांनी कोल्हापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता.
कोल्हापूरला ते येताना नेहमी आजरामार्गे येत असत. आजºयाचे दिवंगत भाजप नेते बाबूराव कुंभार यांच्याशी त्यांचे जवळचे संंबंध. गोव्यातील मंडळींच्या गाडीला आजºयाजवळ अपघात झाल्यानंतर बाबूराव कुंभार यांनी जी मदत केली होती, तिचा ते नेहमी आवर्जून उल्लेख करीत असत. अरुण देसाई हे आजºयाचे सरपंच असताना १९९९ साली हनुमान व्यापारी संकुलाच्या उद्घाटनासाठी आणि जॉन अ‍ॅलेक्स फर्नांडिस यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाला ते आवर्जून आजºयात आले होते. राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी २०१४ साली पर्रीकर यांनी इचलकरंजी येथे सभा घेतल्याचीही आठवण यानिमित्ताने जागविण्यात आली.

अर्थमूव्हर्सवाले प्रभावित
कोल्हापुरातील अर्थमूव्हिंग कंत्राटदारांची यंत्रसामग्री अनेक वर्षे मायनिंगच्या कामासाठी गोव्यात होती. त्यांच्या काही अडचणी होत्या. शशांक देशपांडे यांच्या पुढाकाराने त्यावेळी भैया घोरपडे, अभय देशपांडे, रवी पाटील यांचे शिष्टमंडळ पर्रीकरना भेटले. पाऊण तास त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. एक मुख्यमंत्री इतका वेळ आपल्यासाठी देतो, यावर या सर्वांचा विश्वासच बसला नाही.
बर्फाचा गोळा...
एका कार्यक्रमानंतर पर्रीकर आणि शशांक देशपांडे सबजेलसमोरून येत होते. त्यांना बर्फाचे गोळे विकणारा दिसला. ‘असले गोळे गोव्यात मिळत नाहीत,’ असे म्हणत गाडीतून उतरून त्यांनी गोळा खाल्ल्याची आठवण सांगण्यात आली.

Web Title: Parrikar's relationship with Kolhapur, Ajara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.