हल्ले रोखण्यासाठी जर्मनीत अंशत: बुरखाबंदीस मंजुरी

By admin | Published: April 30, 2017 12:57 AM2017-04-30T00:57:41+5:302017-04-30T00:57:41+5:30

जर्मन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने (बुंडेस्ताग) कट्टरवादी हल्ले रोखण्यासाठी अंशत: बुरखाबंदीस, तसेच सुरक्षेच्या इतर काही उपायांनाही मंजुरी दिली आहे.

Partial approval for partial blockade in Germany to prevent attacks | हल्ले रोखण्यासाठी जर्मनीत अंशत: बुरखाबंदीस मंजुरी

हल्ले रोखण्यासाठी जर्मनीत अंशत: बुरखाबंदीस मंजुरी

Next



कोल्हापूर : महानगरपालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी शनिवारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन पुईखडी ते परितेदरम्यान टाकलेल्या जलवाहिनीची तसेच ठिकपुर्ली येथील बांधण्यात आलेल्या लोखंडी उड्डाणपुलाची पाहणी केली.
दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीतर्फे उद्या, सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाची व या प्रकल्पात असणाऱ्या इतर त्रुटी व भ्रष्टाचाराची सी.आय.डी. चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी यांनी दिली.
या योजनेत घोटाळा झाल्याची शक्यता असल्याने त्याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन उद्या, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असून, त्यामध्ये आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची बैठक शनिवारी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, आशिष ढवळे, शेखर कुसाळे, संतोष गायकवाड, नगरसेविका रूपाराणी निकम, मनीषा कुंभार, उमा इंगळे, अश्विनी बारामते यांच्यासह आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी थेट पाईपलाईन योजनेत कशा प्रकारे घोटाळा झाला आहे याची माहिती महाडिक यांना देण्यात आली. महाडिक यांनी सर्व नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ घेऊन सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन यावेळी दिले. भेटण्याचे ठिकाण व वेळ आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतो, असेही त्यांनी सांगितले. बैठक संपल्यानंतर सर्व नगरसेवकांनी योजनेच्या कामाची पाहणी केली. (हॅलो ४ वर)


वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्या : चंद्रकांतदादा
कोल्हापूर : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या उलटसुलट चर्चा आणि आरोपांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दखल घेतली आणि त्यांनी या योजनेबाबतचा वस्तुस्थितिदर्शक अहवाल लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्याची सूचना महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना केली.
थेट पाईपलाईन योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्यापासून ते ठिकपुर्ली येथील उड्डाणपूल बांधण्यापर्यंत अनेक प्रकारच्या त्रुटी व घोटाळे निर्माण झाले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी केली होती. हीच मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनीही केली आहे. वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांमुळे कोल्हापूरच्या जनतेच्या मनात या योजनेबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. योजनेच्या कामाकडे लोक वेगळ्या नजरेने बघत आहेत. त्यामुळे नेमके काय घडले आहे, याचा शोध घेऊन वस्तुस्थितिदर्शक अहवाल आयुक्तांनी तयार करावा आणि तो मुख्यमंत्र्यांना पाठवावा, अशी सूचना आपण केली असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Web Title: Partial approval for partial blockade in Germany to prevent attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.