हद्दवाढीच्या चळवळीत सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:56+5:302021-08-26T04:27:56+5:30

दरम्यान, बैठकीत असोसिएशनचे काही प्रमुख पदाधिकारी आणि २० गावांतील काही सदस्यांनी महापालिकेच्या कारभारी नगरसेवकांच्या भानगडी आणि प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजामुळे ...

Participate in the boundary movement | हद्दवाढीच्या चळवळीत सहभागी व्हा

हद्दवाढीच्या चळवळीत सहभागी व्हा

Next

दरम्यान, बैठकीत असोसिएशनचे काही प्रमुख पदाधिकारी आणि २० गावांतील काही सदस्यांनी महापालिकेच्या कारभारी नगरसेवकांच्या भानगडी आणि प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजामुळे हद्दवाढीत येण्यास गावांचा विरोध असल्याचे सांगितले.

शहराच्या हद्दवाढीचे फायदे सांगताना कॉमन मॅन संस्थेचे प्रमुख ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले की, आताच्या सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव देण्याची सूचना महापालिकेस जानेवारीमध्ये दिली. त्यानंतर पुन्हा एकदा हद्दवाढीचा विषय ऐरणीवर आला आहे. सन २०१७ मध्ये हद्दवाढीचा विषय समोर आल्यानंतर ४२ गावांचे प्राधिकरण केले; पण प्राधिकरणास गावांचा विकास करण्यात अपयश आले आहे. शहरात शिक्षण, रस्ते, दळणवळणाच्या आणि मूलभूत सूुविधा चांगल्या आहेत. काही त्रुटी असल्या तरी प्राधिकरणातील ४२ गावांपेक्षा चांगल्या सुविधा महापालिकेतर्फे दिल्या जातात. ग्रामीणपेक्षा शहरातील घरफाळाही कमी आहे. घनकचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले जाते. नियंत्रित विकास होत आहे; पण अनेक वर्षांपासून हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. केंद्राकडून विकास निधी मिळण्यात मर्यादा येत आहेत. कमी जागेत जास्त लोकांना राहण्याची वेळ आली आहे. यातूनच शहरात ११ मजल्यापर्यंत इमारतींची उंची गेली आहे. म्हणून शहराची हद्दवाढ होणे गरजेची आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांशी चर्चा करून झाल्यानंतर एक महाबैठक घेण्यात येईल.

प्रजासत्ताक संस्थेचे देसाई म्हणाले की, हद्दवाढ का गरजेची आहे, याची माहिती २० गावांतील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हद्दवाढीसंबंधीचे गैरसमज, शंकांचे निरसनही करण्यात येईल.

केमिस्ट असोसिएश संघटनेचे सचिव मदन पाटील यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी, सदस्यांनी महापालिकेच्या कारभारी नगरसेवकांच्या भानगडी, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजावर बोट ठेवले. शहरातील लोकांनाच महापालिका चांगल्या सेवा, सुविधा देऊ शकत नाही तर मग २० गावांच्या समावेशाचा हट्ट का, असाही प्रश्न उपस्थित केला.

बैठकीस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी ढेंगे, भरतेश कळंत्रे, अशोक बोरगांवे, सचिन पुरोहित, सुधीर खराडे, धवल भरवाडा, शिवाजी यादव आदी उपस्थित होते.

चौकट

माजी मंत्र्यांमुळे

असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद खवरे यांनी महापालिकेपेक्षा सक्षम ग्रामपंचायती चांगल्या सेवा, सुविधा देत असल्याचे सांगितले. प्रल्हाद खवरे यांनी महापालिकेपेक्षा सक्षम ग्रामपंचायती चांगल्या सेवा, सुविधा देत असल्याचे सांगितले. माजी मंत्र्यांनी प्राधिकरणात गावांना ढकलून जबाबदारी झटकल्याचाही आरोप त्यांनी केला.

फोटो : २५०८२०२१-कोल- हद्दवाढ बैठक

कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील केव्हीज प्लाझामध्ये बुधवारी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांसोबत शहर हद्दवाढीसंबंधी बैठक झाली. बैठकीत ॲड. बाबा इंदूलकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Participate in the boundary movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.