अशोकराव माने हॉस्पिटलच्या सुवर्णप्राशन शिबिरात १२५ मुलांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:27+5:302021-06-17T04:16:27+5:30
हॉस्पिटलच्या हॉलमध्ये सामाजिक अंतर ठेवत शिबिर झाले. हे शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरू पुष्यनक्षत्राच्या दिवशी डिसेंबर महिन्यापर्यंत घेण्यात येणार आहे. ...
हॉस्पिटलच्या हॉलमध्ये सामाजिक अंतर ठेवत शिबिर झाले. हे शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरू पुष्यनक्षत्राच्या दिवशी डिसेंबर महिन्यापर्यंत घेण्यात येणार आहे. नवजात बालकापासून ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्याच शिबिरात परिसरातील अनेक गावांच्या बालकांच्या उपस्थितीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने बालकांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले.
रोगप्रतिकारशक्ती वाढणे, मेंदूचा विकास, साथीच्या आजारापासून संरक्षण, वातावरणातील बदलापासून व रोगांपासून बचाव, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी एकाग्रता, अशा अनेक कारणांसाठी हे सुवर्णप्राशन अधिक उपयोगी असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीशकुमार यांनी हे सुवर्णप्राशन बनविले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांना, मुलांना ते थेंबाच्या स्वरूपात देण्यात आले. यासाठी डॉ. सत्यजित माने, डॉ. निशा पन्हाळकर, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. प्रियांका माने, कुलदीप शिंदे, सायली शिखरे यांचे सहकार्य लाभले.
१६ माने
फोटो ओळी-
वाठार येथील अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या वतीने आयोजित शिबिरात बालकास औषधाचे थेंब पाजताना डॉक्टर.