पीक विम्यात अडीच हजार शेतकºयांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 09:17 PM2017-08-05T21:17:42+5:302017-08-05T21:19:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत कोल्हापूर जिल्'ातील २५०० शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. राज्य सरकारच्या वाढीव मुदतीला शेतकºयांना चांगला प्रतिसाद दिला.
खरीप हंगामातील पिकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान राष्टÑीय पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन शेतकºयांना केले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने दोन वेळा मुदतवाढ दिली; पण मराठवाडा, विदर्भात पीक विम्याचे हप्ते भरण्यासाठी शेतकºयांची अक्षरश: झुंबड लागली होती. बॅँकांच्या दारासमोर हप्ते भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी हप्ते भरू शकले नव्हते. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसने विधिमंडळात केली होती. त्यानंतर सरकारने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.
विमा हप्ता भरून घेण्यास जिल्हा बॅँकांनाही ३१ जुलैपर्यंत परवानगी होती. या कालावधीत जिल्हा बॅँकेकडे केवळ ६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १७ हजार २६१ रुपयांची हप्ता रक्कम जमा केली होती. वाढीव मुदतीत केवळ राष्टÑीयीकृत बॅँका व इतर वित्तीय संस्थांना हप्ता भरून घेण्यास सहकार विभाग व विमा कंपनीने परवानगी दिली होती. जिल्'ात उसाचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने विमा योजनेत सहभागी होण्यात अडचण होती. तरीही जिल्'ातून अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारपर्यंत जिल्'ातील २५०० शेतकºयांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे.