ब्राह्मण सभेच्या वक्तृत्व स्पर्धेत ४३४ स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:02+5:302021-08-29T04:24:02+5:30

महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, सुधीर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह निकाल जाहीर करण्यात आला. सभेचे ...

Participation of 434 contestants in the oratory competition of Brahman Sabha | ब्राह्मण सभेच्या वक्तृत्व स्पर्धेत ४३४ स्पर्धकांचा सहभाग

ब्राह्मण सभेच्या वक्तृत्व स्पर्धेत ४३४ स्पर्धकांचा सहभाग

Next

महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, सुधीर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह निकाल जाहीर करण्यात आला. सभेचे संचालक रामचंद्र पुरोहित यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष नंदकुमार मराठे यांनी स्वागत केले. कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी निकालवाचन केले. संचालिका अनुराधा गोसावी यांनी आभार मानले. सर्वाधिक विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल शेलाजी वनाजी विद्यालयाला कायमस्वरूपी ढाल बक्षीस देण्यात आली.

यावेळी उपाध्यक्ष संतोष कोडोलीकर, सहकार्यवाह अशोक कुलकर्णी, व्यवस्थापक अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख म्हणून तन्मय कुलकर्णी यांनी काम पाहिले. तुषार दिवेकर यांचेही सहकार्य लाभले.

स्पर्धेचा निकाल

पहिली ते दहावी या गटांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

१ अन्विता जाधव, अनंतराव भिडे वि. मं., इचलकरंजी, गार्गी घुंगुर्डे, इंडियन डेल स्कूल, आराध्य आपटे, कामत विद्यालय, सावंतवाडी

२ अवनी फडके, गंगामाई विद्यामंदिर, इचलकरंजी, श्रीया बर्वे, ईडन स्कूल, म्हापसा, प्रणिती देशपांडे, जोतिबा फुले, मलिग्रे, ता. आजरा

३ शमिका चिपकर, कुडाळ हायस्कूल, मैत्री कुलकर्णी, अंकला हायस्कूल, सांगली, मयांक कांबळे, काकासाे माने हायस्कूल, रूकडी

४ तन्वी सप्तर्षी, हुजुरपागा, पुणे, याज्ञी जोशी, सेंट मोनिका हायस्कूल, विजापूर, सोहम शिराळकर, स. म. लोहिया हायस्कूल, कोल्हापूर

५क्षितिजा घोलप, शारदा इंग्लिश स्कूल, कोपरगाव, प्रीती इंगवले, शिये हायस्कूल, सिध्दी गायकवाड, इंदुमती हायस्कूल

Web Title: Participation of 434 contestants in the oratory competition of Brahman Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.