मटका व्यवसायात भागीदारी
By admin | Published: May 29, 2014 01:16 AM2014-05-29T01:16:24+5:302014-05-29T01:28:33+5:30
आठजणांना अटक
कोल्हापूर : मटका व जुगारात भागीदारी करणार्या बुकीएजंटासह मटका खेळणार्या आठजणांना आज, बुधवारी करवीर पोलिसांनी अटक केली. फुलेवाडी नाक्यासमोर साखळी पद्धतीने मटका घेताना जालंदर शिंदे याच्यासह श्रीकृष्ण ऊर्फ विजय सकट व विष्णू जाधव यांना अटक केली होती. त्यांच्याकडून रोख ८ हजार २२५ रुपये व ८ मोबाईल हँडसेट असा सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फुलेवाडी नाक्यासमोर श्रीकृष्ण सकट हा मटका घेत असल्याची माहिती खबर्याद्वारे मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांना सकट याला अटक केली. त्यानंतर त्याला मदत करणारे विष्णू जाधव व जालंदर शिंदे या दोघांनाही अटक केली. हे तिघे एकमेकाला मटका फिरवत होते. जालंदर शिंदे हा मटक्याचा खेळ पुढे कोणाला फिरवत होता याची माहिती घेतली असता एजंटासह मटका खेळणार्यांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकातील संजय पडवळ, बाबूराव घोरपडे, प्रथमेश पाटील, राजेंद्र बरगाले, प्रशांत घोलप यांनी संशयित राजेंद्र ज्ञानू जांभळे (वय ३२, रा. बालिंगा, ता. करवीर), प्रवीण प्रकाश हर्षे (२५), मंगेश प्रकाश हर्षे,(३०), गजानन बाळासो शिंदे (३४, तिघे रा. जुना बुधवार पेठ), शरद बाळकृष्ण मोरे (४३, रा. सोनतळी, ता. करवीर),अवधूत जगन्नाथ भालेरे (५८, मस्कृती तलाव), महिपती बापू पोवार (६१, डी वॉर्ड, तोरस्कर चौक), संदीप शिवलिंग गवळी (२९, गवळी गल्ली, शनिवार पेठ) आदींना त्यांच्या घरी अटक केली. या रॅकेटमध्ये आणखी काहीजणांचा समावेश आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय गुरखे करीत आहेत. (प्रतिनिधी)