कोल्हापुरात ‘पक्षीय’ गुंता : कॉँग्रेसचे आमदार सेनेच्या, तर भाजपचे राष्टवादीच्या प्रचारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:54 AM2019-03-14T00:54:33+5:302019-03-14T00:54:53+5:30
कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या ्नराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अशी विचित्र परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, ती दुरुस्त करण्यास वेळ कशाला घालवायचा? असा सवाल करीत आपण सतेज पाटील यांच्यासह वरिष्ठांशी संपर्क साधला नाही; खासदारांनीच साधला असेल तर
कोल्हापूर : कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या ्नराष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अशी विचित्र परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, ती दुरुस्त करण्यास वेळ कशाला घालवायचा? असा सवाल करीत आपण सतेज पाटील यांच्यासह वरिष्ठांशी संपर्क साधला नाही; खासदारांनीच साधला असेल तर आपणाला माहिती नसल्याचे राष्टÑवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार मुश्रीफ म्हणाले, मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करून प्रचाराची रणनीती ठरविली जाणार आहे. कागलमध्ये आपण, राधानगरी-भुदरगडमध्ये के. पी. पाटील व ए. वाय. पाटील; तर चंदगड मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर हे उद्यापासूनच प्रचारास सुरुवात करतील. जिथे राष्टÑवादीची ताकद कमी आहे, त्या ‘करवीर’मध्ये मधुकर जांभळे, ‘उत्तर’मध्ये आर. के. पोवार, तर ‘दक्षिण’मध्ये स्वत: महाडिक गावागावांत जाणार आहेत.
कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे उघड शिवसेनेच्या प्रचारात असल्याबाबत लक्ष वेधले असता, मुश्रीफ म्हणाले, जे आहे ते अपेक्षितच होते. त्यासाठी आता वेळ कशाला घालवायचा? कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या व्यासपीठावर जिल्ह्यात ‘पक्षीय’ गुंता
(पान १ वरून) अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आपण तरी सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास उपस्थित होते
‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील : महाडिक
कोल्हापूर : आपण कोणाशी बोललो नाही, ज्यांचा पंतप्रधान करायचा आहे, ते बघतील. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सांभाळतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी आपण सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याची टिप्पणी केली होती. त्यावर खासदार महाडिक यांनी असे प्रत्युत्तर देऊन सतेज पाटील यांची मनधरणी करणार नसल्याचेच स्पष्ट केले.
आघाडीची घोषणा लवकर होणे अपेक्षित
कॉँग्रेससोबतची आघाडी निश्चित असली तरी प्रचारात सक्रिय करण्यासाठी लवकर निर्णय अपेक्षित आहे. आघाडीत शेकाप, जनता दल, रिपाइं (गवई व कवाडे गट) हेही पक्ष असून, त्यांनाही सक्रिय करावे लागणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
अमल उघड प्रचार करतील
आमदार अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे भाऊ आहेत. भाऊ निवडणुकीस उभारल्याने ते उघड प्रचार करतील, त्यात लपविण्यासारखे काय आहे? असे मुश्रीफ यांनी सांगितले.