प्रवाशांनी घेतला सिमंधर स्वामी भवन मंदिरात आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:13+5:302021-07-27T04:25:13+5:30
: पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे पुणे-बेंगलोर महामार्ग बंद झाल्याने हजारो वाहने महामार्गावर अडकून पडली. बेंगलोरकडे जाणारी वाहने शिरोलीत अडकली. त्यामुळे ...
: पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे पुणे-बेंगलोर महामार्ग बंद झाल्याने हजारो वाहने महामार्गावर अडकून पडली. बेंगलोरकडे जाणारी वाहने शिरोलीत अडकली. त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना राहायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, शिरोली सांगली फाटा येथील सिमंधर स्वामी भवन मंदिरात या प्रवाशांना आसरा देण्यात आल्याने त्यांची गैरसोय दूर झाली. येथे २५० हून अधिक प्रवासी आणि पोलिसांना राहण्याची सोय झाली. याठिकाणी प्रवाशांना आणि वाहन चालक- मालक यांना राहण्याची, जेवणाची, कपड्यांची सोय करण्यात आली होती. पुणे- बंगळूर महामार्गावर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचीही सोय या मंदिरात करण्यात आली.
फोटो : २७ शिरोली सिमंधर स्वामी भवन
सिमंधर स्वामी भवन येथे पोलिसांची राहण्याची सोय करण्यात आली होती.