चंदूर-कबनूर मार्गावर पॅचवर्कचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:22 AM2020-12-24T04:22:54+5:302020-12-24T04:22:54+5:30
(फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : चंदूर-कबनूर (ता. हातकणंगले) या मार्गावरील अर्धवट पद्धतीने एक थराचा केलेला रस्ता लॉकडाऊनमुळे प्रलंबित ...
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : चंदूर-कबनूर (ता. हातकणंगले) या मार्गावरील अर्धवट पद्धतीने एक थराचा केलेला रस्ता लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिला आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागमोडी वाहतूक सुरू असून, अपघातास निमंत्रण मिळत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पॅचवर्क करून खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी रस्त्यावरील दोन थराचे काम झाले; परंतु मुख्य थर न झाल्याने अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर ऊस वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले. त्यातून मार्ग काढत खड्डे चुकविण्यासाठी वाहनधारक व ऊस वाहतूक करणारे चालक नागमोडी वळणे घेत मार्गक्रमण करीत होते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. तसेच रस्ताही निखळून चालला होता. मंगळवारपासून पॅचवर्कचे काम सुरू झाले असले तरी रस्त्यावरील मुख्य थर पूर्ण करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
(फोटो ओळी) चंदूर-कबनूर मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्कचे काम सुरू झाले आहे.