Kolhapur: पाटगांव हनी ब्रँड जगभर पोहोचवणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:57 PM2023-10-28T13:57:43+5:302023-10-28T13:58:05+5:30

कडगाव : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करून "पाटगाव हनी ब्रँड" जगभरात ...

Patgaon Honey will deliver the brand all over the world, Guardian Minister Hasan Mushrif assurance | Kolhapur: पाटगांव हनी ब्रँड जगभर पोहोचवणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन 

Kolhapur: पाटगांव हनी ब्रँड जगभर पोहोचवणार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन 

कडगाव : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करून "पाटगाव हनी ब्रँड" जगभरात पोहोचवणार असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.

मधाचे गाव पाटगाव"चा लोकार्पण सोहळा व मधपाळ मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, नाबार्डचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनिलकुमार रावत, इंडो काऊंट फाउंडेशनचे संदीपकुमार, जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समन्वयक संदेश जोशी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रवर्तक अविनाश पाटील, पाटगावचे सरपंच विलास देसाई उपस्थित होते. यावेळी १०० मधपाळकांना प्रमाणपपत्राचे वितरण तसेच १२०० मधपेट्यांचे वाटप झाले. 'पाटगाव हनी ब्रँड' आणि 'हनी चॉकलेट'चे अनावरण झाले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, पाटगावसह मठगाव, शिवडाव, अंतुर्ली, तांब्याची वाडी या पाचही ग्रामपंचायतींना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी निधीची मागणी केली असून त्यासाठी प्रयत्न केले जातील. पाटगाव ते रांगणा किल्ला मार्गावरील असणाऱ्या पुलाच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देऊ.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, उपक्रमामुळे या भागातील गावे स्वयंपूर्ण होऊन खऱ्या अर्थाने 'ग्रामविकास' साधला जाईल. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी प्रधानमंत्री यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पाटगावचा समावेश होण्यासाठी व उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, मध उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या योजनेतून २ कोटी २७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मध उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी पाटगाव येथे भव्य हनी पार्क व सामूहिक सुविधा केंद्र तयार करण्यात येणार आहे. भविष्यात "पाटगाव हनी ब्रँड" आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करू. नाबार्डचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनिलकुमार रावत यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कोणतेही उत्पादन जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत जौंजाळ यांनी आभार मानले.

Web Title: Patgaon Honey will deliver the brand all over the world, Guardian Minister Hasan Mushrif assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.