रुग्ण कल्याण समिती योजनेेसाठी जि. प. कडुन १ कोटी ६२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:11+5:302021-02-17T04:29:11+5:30
दरवर्षी जून ते जुलै महिन्यादरम्यान दोन टप्प्यात रुग्ण कल्याण समिती योजनेचा हा निधी दिला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या ...
दरवर्षी जून ते जुलै महिन्यादरम्यान दोन टप्प्यात रुग्ण कल्याण समिती योजनेचा हा निधी दिला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाचा बहुतांश निधी हा कोरोनावरील उपाययोजनांवर खर्च झाल्यामुळे रुग्ण कल्याण समिती योजनेचा २०२०-२१ या चालू वर्षातील हा निधी मिळण्यास विलंब झाला.
पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आलेल्या निधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्ण कल्याण समिती निधी २५ हजार रपये, वार्षिक देखभाल निधी १५ हजार, अबंधित निधी १२ हजार ५०० रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे; तर प्राथमिक आरोग्य पथकासाठी वार्षिक देखभाल निधी ११ हजार रुपये., अबंधित निधी १० हजार रुपये, तसेच ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीसाठी १० हजार रुपये अबंधित निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या पथकांना सुमारे ४१ लाख ४७ हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे. तर जिल्ह्यातील १२०६ ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीना प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे एकूण १ कोटी २० लाख ६० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.