आण्णांच्या रूपाने दर्दी कुस्तीगीर हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:15+5:302020-12-17T04:47:15+5:30
शहा म्हणाले, मी आणि श्रीपती अण्णा एकसंब्याहून कोल्हापुरत आलो. त्यात अण्णा शाहूपुरी तालमीत रमले आणि मी व्यवसायात रमलो. त्यांनी ...
शहा म्हणाले, मी आणि श्रीपती अण्णा एकसंब्याहून कोल्हापुरत आलो. त्यात अण्णा शाहूपुरी तालमीत रमले आणि मी व्यवसायात रमलो. त्यांनी गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या तगड्या मल्लांना चितपट करून देशाची पहिली हिंदकेसरीची गदा मिळविण्याचा मान पटकावला. आज कितीही सुविधा असूदेत; मात्र, त्यांच्यासारखा मल्ल घडणे शक्य नाही. याप्रसंगी कुस्ती निवेदक रामदास गायकवाड म्हणाले, कुस्ती क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या हिंदकेसरीची गदा त्यांनी अपार कष्टावर मिळविली. त्यांच्यासारख्या चित्त्याच्या चालीचा मल्ल आजपर्यंत झाला नाही. अप्पा बंडगर, मल्लाप्पा खंचनाळे, अण्णा पाटील, चंद्रकांत बुड्डे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अप्पासाहेब देशपांडे, प्रकाश चौगुले, सुरेश बुळे, विठ्ठल पाटील, दिलीप पाटील, अभिजित पाटील, शिवगौंडा पाटील, महेश पाटील, बाळासाहेब लंबे, सत्यजित खंचनाळे, रोहित खंचनाळे यांच्यासह सोसायटीतील मान्यवर सदस्य, सभासद उपस्थित होते.
फोटो : १६१२२०२०-कोल-श्रीपती खंचनाळे
आेळी : देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापुरात रुईकर काॅलनीतील हिंद को-ऑप. सोसायटीमध्ये बुधवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती.