‘पाटाकडील अ’ अंतिम फेरीत : अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धा -रोमहर्षक लढतीत ‘दिलबहार अ’चा सडनडेथवर पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:59 AM2019-01-20T00:59:48+5:302019-01-20T01:02:44+5:30

फुटबॉल रसिकांची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ ’ ने दिलबहार तालीम मंडळ ‘अ’चा सडनडेथवर पराभव करीत स्पर्धेची

'Patna A' final: Asmita Cup Football Championship - Dhambahar A's defeat at Sydney | ‘पाटाकडील अ’ अंतिम फेरीत : अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धा -रोमहर्षक लढतीत ‘दिलबहार अ’चा सडनडेथवर पराभव

फुटबॉलचा थरार : कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील ‘अ ’ व दिलबहार ‘अ’ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण.

Next

कोल्हापूर : फुटबॉल रसिकांची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ ’ ने दिलबहार तालीम मंडळ ‘अ’चा सडनडेथवर पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विजयी ‘पाटाकडील’ची गाठ आता अंतिम फेरीत रविवारी (दि.२७) ‘फुलेवाडी ’ संघाबरोबर पडणार आहे.

शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत दोन्ही संघांत उपांत्य लढत झाली. फुटबॉलरसिक व दोन्ही संघांसाठी ही लढत म्हणजे अंतिम सामनाच होता. त्यामुळे दोन्ही संघांनी ‘किक आॅफ’पासूनच एकमेकांवर आक्रमक चाली रचल्या. पाटाकडीलकडून ऋषिकेश मेथे-पाटील, ओंकार पाटील, ओंकार जाधव, जॉन्सन, वृषभ ढेरे यांनी खोलवर चढाया केल्या. त्यांना आठव्या मिनिटात यश आले. यात ओंकार जाधवने गोल करीत संघास महत्त्वपूर्ण १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘^दिलबहार’कडून जावेद जमादार, अ‍ॅमोस, इम्यान्युअल इचिबेरी, सचिन पाटील, सूरज शिंगटे, अकिल पाटील यांनीही तितक्याच जोरदारपणे चढाया केल्या. यात सचिन पाटीलला गोल करण्याची आयती संधी चालून आली. मात्र, त्याला गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे पूर्वार्धात पाटाकडीलकडे १-० अशी आघाडी राहिली.

पूर्वार्धात ‘दिलबहार’कडून सामन्यात बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. यात सचिन पाटील, अ‍ॅमोस, जावेद जमादार, इम्यान्युअल, सूरज श्ािंगटे यांनी पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात अनेकदा गोल करण्यासाठी धडक मारली. मात्र, पाटाकडीलकडून अक्षय मेथे-पाटील, सैफ हकिम यांनी बचावफळी भक्कमपणे सांभाळत ‘दिलबहार’चे गोल करण्याचे मनसुबे उधळले.

सामन्यांच्या ७१ व्या मिनिटाला दिलबहारकडून इम्यान्युअलने हेडद्वारे गोल करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी करीत रंगत आणली. त्यामुळे सामन्यात पुन्हा चुरस निर्माण झाली. दोन्ही संघांकडून एकमेकांवर आघाडी घेण्यासाठी ‘करो या मरो’ या पद्धतीने खेळ झाला. मात्र, सामना १-१ असा बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय पंचांनी घेतला.

यात पाटाकडीलकडून जॉन्सन, सैफ हकिम, वृषभ ढेरे यांनी गोल केले. तर ओंकार पाटील, अक्षय मेथे-पाटील यांना गोल करण्यात यश आले नाही. तर ‘दिलबहार’कडून प्रतीक व्हनाळीकर, इम्यान्युअल, सुदीपत दास यांनी गोल नोंदविले. मोहित मंडलिकचा फटका गोलरक्षकाने तटविला व सणी सणगरचा फटकाही वाया गेला. त्यामुळे सामना ३-३ अशा रंगतदार स्थितीत आला. त्यामुळे सडनडेथचा अवलंब करण्यात आला. यात ‘दिलबहार’च्या पवन माळी, अ‍ॅमोस यांचे फटके बाहेर गेले. तर ‘पाटाकडील’च्या ऋषिकेश मेथे पाटीलने गोल करीत संघाला विजयासह अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली.


हिरो ठरला ‘ऋषिकेश’
पेनॅल्टी स्ट्रोकवर ३-३ अशी बरोबरी झाल्यानंतर सडनडेथवर नेहमीच्या गोलरक्षकाऐवजी पाटाकडीलचा आघाडीचा खेळाडू ऋषिकेश मेथे-पाटीलने गोलरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यात त्याने दिलबहारच्या दोन खेळाडूंचे फटके तटविले. यापूर्वीही अशीच स्थिती आल्यानंतर ऋषिकेशने गोलरक्षण करीत अंतिम सामन्यात संघाला विजयी करण्यास मदत केली आहे.
त्याच्या या अष्टपैलू खेळीची चर्चा सामना संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या तोंडी होती.

हुल्लडबाजी, शेरेबाजीचा कहर : खेळाडूंनी अवैध खेळ केल्यानंतर मुख्य पंच सुनील पोवार, सहायक पंच अजिंक्य गुजर, अवधूत गायकवाड, राहुल तिवले यांनी योग्य निर्णय घेतला. तरीही काही हुल्लडबाजांनी पंचांच्या निर्णयावर अत्यंत खालच्या पातळीवर जात प्रेक्षक गॅलरीतून वारंवार शेरेबाजी केली. त्यामुळे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.


 

Web Title: 'Patna A' final: Asmita Cup Football Championship - Dhambahar A's defeat at Sydney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.