‘पाटाकडील’, ‘पोलीस’ची आगेकूच : राजेश चषक फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:44 AM2019-02-02T00:44:12+5:302019-02-02T00:44:53+5:30

पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा १-० ने; तर कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा २-१ ने पराभव करीत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू स्टेडियमवर सुरू

'Patnaer', 'Police' advance: Rajesh Cup soccer competition | ‘पाटाकडील’, ‘पोलीस’ची आगेकूच : राजेश चषक फुटबॉल स्पर्धा

कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी कोल्हापूर पोलीस संघ व खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.

Next
ठळक मुद्दे‘ऋणमुक्तेश्वर’, खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ पराभूत

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा १-० ने; तर कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा २-१ ने पराभव करीत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी पाटाकडील ‘अ’ व ऋणमुक्तेश्वर यांच्यात सामना झाला. प्रारंभापासून ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटील, सैफ हकीम, रणजित विचारे, पवनकुमार सरनाईक, इथो डेव्हिड यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले; पण ‘ऋणमुक्तेश्वर’कडून जीवन लुद्रिक, अनिरुद्ध शिंदे, संदेश शिंदे यांनी प्रतिकार करीत चुरशीचा खेळ केला. त्यामुळे पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

उत्तरार्धात ५५ व्या मिनिटाला पाटाकडील ‘अ’च्या हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘ऋणमुक्तेश्वर’कडून बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत गोल करण्यात यश आले नाही; त्यामुळे हा सामना एकमेव गोलने पाटाकडील ‘अ’ने जिंकला.दुसऱ्या सामना कोल्हापूर पोलीस संघ व खंडोबा ‘अ’ यांच्यात झाला. तिसºया मिनिटास मिळालेल्या संधीवर ‘खंडोबा’कडून ऋतुराज संकपाळने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘पोलीस’ संघाकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना गोल करता आला नाही.

पूर्वार्धात ४९ व्या मिनिटास पोलीस संघाच्या इंद्रजित मोंडलने गोल करीत संघास १-१ असे बरोबरीत आणले. त्यानंतर पुन्हा ५२ व्या मिनिटास इंद्रजित मोंडलने पोलीस संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत २-१ ने संघास सरशी मिळवून दिली. पोलीस संघाकडून युक्ती ठोंबरे, अजित पोवार, प्रथमेश हेरेकर, जय कामत, सोमनाथ पाटील; तर खंडोबा ‘अ’ संघाकडून प्रतीक सावंत, रणवीर जाधव, त्रिवेण डायस यांनी चांगला खेळ केला. मात्र, त्यांना बरोबरी साधता आली नाही. अखेरीस २-१ या गोलसंख्येवर कोल्हापूर पोलीस संघाने विजय मिळवत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.


आजचा सामना
दु. २ वा. शिवाजी तरुण
मंडळ विरुद्ध बालगोपाल
दु. ४ वा. संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध प्रॅक्टिस ‘अ’.
 

Web Title: 'Patnaer', 'Police' advance: Rajesh Cup soccer competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.