पाटणे फाट्याचा श्वास गुदमरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:49+5:302021-06-26T04:17:49+5:30

निंगाप्पा बोकडे । चंदगड : नवीनच मोठी बाजारपेठ वसल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने बेशिस्त पार्किंग, भाजीवाल्यांचे अतिक्रमण आणि ...

Patne is suffocating | पाटणे फाट्याचा श्वास गुदमरतोय

पाटणे फाट्याचा श्वास गुदमरतोय

Next

निंगाप्पा बोकडे ।

चंदगड : नवीनच मोठी बाजारपेठ वसल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने बेशिस्त पार्किंग, भाजीवाल्यांचे अतिक्रमण आणि कचरा यामुळे पाटणे फाट्याचा श्वास गुदमरत चालला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मजरे कारवे (ता. चंदगड) व तावरेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावर काही वर्षांपासून सर्व सोयींयुक्त पाटणे फाटा येथे मोठी बाजारपेठ वसली आहे.

जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला व फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. त्याचबरोबर विविध प्रकारचे दवाखाने, मेडिकल्स, हॉटेल्स, माल कपड्यांची दुकाने, बार, राईस मिल, मटण-चिकनची दुकाने आहेत. या फाट्याच्या चारी बाजूने बसर्गे, माणगाव, गौळवाडी, हलकर्णी, धुमडेवाडी, जंगमहट्टी, पाटणे, यशवंतनगर, तुर्केवाडी अशी अनेक मोठी गावे आहेत.

या गावांतील लोक रोजच विविध कारणांमुळे पाटणे फाट्याला भेट देत असतात. यामुळे फाट्यावर नेहमीच सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. मटण-चिकन दुकानातील कचरा, खराब भाजीपाला, दवाखान्यातील कचरा यांची विल्हेवाट योग्य प्रकारे केली जात नाही. त्यामुळे परिसरात कच-यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जवळील बेळगाव बाजारपेठेलाही जात नसल्याने दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.

त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलिसांनी योग्य ती उपाययोजना हाती घेतल्यास निश्चितच ही परिस्थिती बदलू शकते.

चौकट : पोलिस असून अडचण नसून खोंळबा

एवढी मोठी बाजारपेठ असतानाही बेशिस्त पार्किंग, गैरप्रकार यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. पोलिसांचा धाक नसल्यानेच सर्वसामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीसही नेहमीच अपु-या मनुष्यबळाचे कारण पुढे करत जबाबदारी झटकत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

........

तुर्केवाडी बाजारपेठेचे महत्त्व झाले कमी

चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध जनावरांचा बाजार व मोठी बाजारपेठ म्हणून तुर्केवाडी बाजाराकडे पाहिले जात होते. प्रत्येक आठवड्याला परिसरातील लोक बाजाराच्या निमित्ताने एकवटत असत. पण गेली दोन वर्षे कोरोनामुळे बाजारच भरला नाही. त्याची जागा पर्यायाने पाटणे फाट्याच्या बाजारपेठेने घेतले आहे.

फोटो ओळी :

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे साचलेला कचरा.

क्रमांक :२५०६२०२१-गड- ०२

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील बेशिस्त पार्किंग.

क्रमांक : २५०६२०२१-गड-०३

Web Title: Patne is suffocating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.