पाटील पिता-पुत्राच्या लॉकरची झडती

By admin | Published: November 19, 2016 01:07 AM2016-11-19T01:07:43+5:302016-11-19T01:07:43+5:30

मंत्रालयातील जलसंपदा विभागात मुख्य अभियंता व सहसचिवपदावर सुरेश पाटील हे काम करीत होते.

Patrick's father-son's locker search | पाटील पिता-पुत्राच्या लॉकरची झडती

पाटील पिता-पुत्राच्या लॉकरची झडती

Next

कोल्हापूर : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव सुरेश लक्ष्मण पाटील (रा. कसबा बावडा) यांच्यासह मुलगा विक्रांत यांच्या कोल्हापुरातील दोन बँकेतील लॉकरची झडती लाचलुचपत पथकाने शुक्रवारी घेतली. झडतीमध्ये लॉकर रिकामी असल्याचे दिसून आले. पाटील यांचे सदाशिव पेठ, पुणे येथील दोन आलिशान फ्लॅट सील करण्यात आले आहेत. आज, शनिवारपासून कागदोपत्री माहिती तपासण्याचे काम सुरू राहणार असल्याचे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले.
मंत्रालयातील जलसंपदा विभागात मुख्य अभियंता व सहसचिवपदावर सुरेश पाटील हे काम करीत होते. त्यांनी २७ आॅक्टोबर १९८० ते ३१ मे २०१२ या कालावधीत चार कोटी १४ लाख २० हजार ७९९ रुपयांची अपसंपदा मिळविली आहे. त्यामुळे गुरुवारी कोल्हापूरसह पुणे, सोलापूर येथे घर व भूखंड, सांगली येथे भूखंड व इतर मालमत्तेच्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून मालमत्तेची झडती घेतली. त्यामध्ये ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ६८.११ टक्के उत्पन्न मिळविले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संशयित सुरेश पाटील, पत्नी विद्या, मुलगा विक्रांत यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी शाहूपुरीतील कराड अर्बन बॅकेमध्ये पाटील यांचे लॉकर आहे, तर बँक आॅफ इंडिया शाखा, शाहूपुरीमध्ये मुलगा विक्रांत याचे लॉकर आहे. या दोन्ही लॉकरची झडती घेतली असता ती रिकामी होती. पाटील यांचे कोल्हापुरात स्टेशन रोड परिसरातील रेडियट हॉटेलमध्ये भागीदारी आहे. कोल्हापुरात दोन बंगले, कसबा बावडा व कागल येथील शेतजमीन, सोलापूरमध्ये आर.सी.सी. घर, वेळापूर (ता. माळशिरस) मध्ये तीन शेतजमिनी, सांगली येथील सांगलीवाडी रोडवर २६ गुंठे रिकामा प्लॉट, आदी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे.


नातेवाईक, मित्रपरिवाराची होणार चौकशी
सुरेश पाटील यांनी नातेवाईक, तसेच मित्रांच्या नावावर काही मालमत्ता घेऊन ठेवली आहे का? त्याच बँक खात्याद्वारे ज्या व्यक्तींशी मोठे व्यवहार झाले आहेत, त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक आफळे यांनी सांगितले.

Web Title: Patrick's father-son's locker search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.