सदाभाउंकडून दानवेंची पाटराखण
By admin | Published: May 11, 2017 03:58 PM2017-05-11T15:58:07+5:302017-05-11T15:58:07+5:30
शेतकरी कुटुंबातील असल्याने दानवेंना आदर
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. ११ : दानवे शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांविषयी त्यांना आदर आहे, कधीही अनास्था असल्याचे जाणवले नाही, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाउ खोत यांनी दानवे यांची पाठराखण केली आहे.
खा. रावसाहेब दानवे यांनी जालना येथे तूरडाळ संदर्भात केलेल्या व्यक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दानवे यांचा तीव्र स्वरूपात निषेध केला होता. सातारा दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री सदाभाउ खोत यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्यांनी दानवे यांची पाठराखण केली.
कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा, अशी मुक्ताफळे दानवे यांनी उधळली. शेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्यांना पाय उतार करण्याची मागणी होत असतानाच सत्तेतील स्वाभिमानीचे मंत्री मात्र या वक्तव्याकडे डोळेझाक करत आहेत, अशी टीका होत आहे.