पेठनाक्याजवळ अपघातात पट्टणकोडोलीचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:33+5:302021-02-08T04:21:33+5:30

अधिक माहिती अशी की, पट्टणकोडोली येथील सागर सहदेव हुक्किरे हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. २६ जानेवारी रोजी ...

Pattankodoli youth killed in an accident near Pethnaka | पेठनाक्याजवळ अपघातात पट्टणकोडोलीचा युवक ठार

पेठनाक्याजवळ अपघातात पट्टणकोडोलीचा युवक ठार

googlenewsNext

अधिक माहिती अशी की, पट्टणकोडोली येथील सागर सहदेव हुक्किरे हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. २६ जानेवारी रोजी त्याने व्हरवडे या गावाजवळ हॉटेल शिवराय हे भाडेतत्त्वावर हॉटेल सुरू केले होते. दोन दिवसांपूर्वी तो हॉटेलकडे गेला होता. मात्र, काही कामानिमित्त तो शनिवारी रात्री उशिरा गावाकडे दुचाकीने येत होता. यावेळी पेठनाक्याजवळ आला असता त्याच्या दुचाकीची धडक अज्ञात वाहनाला बसल्याने तो रस्त्यावरच जखमी अवस्थेत पडला होता. ही बाब महामार्ग आपत्कालीन सुरक्षा विभागाच्या गस्तला असणाऱ्या गाडीला लक्षात आल्याने त्यांनी त्याल‍ा इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती लागताच उपसरपंच कृष्णात मसूरकर, मित्र व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

फोटो : सागर हुक्किरे

Web Title: Pattankodoli youth killed in an accident near Pethnaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.