नगरगाव परिसरात पट्टेरी वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:38+5:302021-01-01T04:17:38+5:30

चंदगड : नगरगाव (ता. चंदगड) परिसरात जंगलात फिरायला गेलेल्या चार दुभत्या जनावरांचा पट्टेरी वाघाने फडशा पाडला. या परिसरात ...

Patteri tiger lives in Nagargaon area | नगरगाव परिसरात पट्टेरी वाघाचे वास्तव्य

नगरगाव परिसरात पट्टेरी वाघाचे वास्तव्य

googlenewsNext

चंदगड : नगरगाव (ता. चंदगड) परिसरात जंगलात फिरायला गेलेल्या चार दुभत्या जनावरांचा पट्टेरी वाघाने फडशा पाडला. या परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चंदगड तालुक्यातील नगरगाव परिसरातील धामणे या कर्नाटक राज्यातील गावाला चहूबाजूने जंगलव्याप्त सीमा आहे. या गावातील चार जनावरे पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने धनगर समाज चिंतेत आहे. शिकार केलेल्या म्हैशीचे मांस खाण्यासाठी वाघ डरकाळ्या फोडत परिसरात फिरत असल्याचे परिसरातील धनगर बांधवांनी सांगितले. धुळाप्पा कोकरे यांच्या चार म्हैशी वाघाने फस्त केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धामणे हे कर्नाटक राज्यात असले तरी त्याच्या चहुबाजूने चंदगड जंगलव्याप्त सीमा आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान कोणत्या राज्याकडे मागावे, हा प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावत असला तरी, संबंधित विभाग, अधिकारी व लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्तांना योग्य ती आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

Web Title: Patteri tiger lives in Nagargaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.