हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 11:03 AM2021-01-08T11:03:55+5:302021-01-08T11:07:04+5:30

Hocky statdeiam astroturf Kolhapur- मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स स्पोर्टस्‌ टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रतिनिधींनी मैदानाची पाहणी केली. लवकरच चाचण्या घेऊन टर्फ बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले.

Pave the way for the installation of astroturf in the hockey stadium | हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग मोकळा

हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देदिल्लीतील कंपनीकडून ग्रीन सिग्नल लवकरच कामाला होणार सुरुवात

कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स स्पोर्टस्‌ टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रतिनिधींनी मैदानाची पाहणी केली. लवकरच चाचण्या घेऊन टर्फ बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले.

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेतून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ॲस्ट्रोटर्फ बसविली जाणार आहे. ११ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये महापालिका ५ कोटी ५० लाख, तर केंद्र शासनाकडून ५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर आहे.

वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विवेक भूषणरॉय, कंपनीचे कऱ्हाड येथील प्रतिनिधी प्रशांत गायकवाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अनुराधा वाडरे, संदीप गुरव, माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी टर्फ बसविण्यासाठी मैदानाची पाहणी केली.

यासंदर्भात भूषणरॉय अहवाल तयार करणार आहेत. यामध्ये कशा प्रकारे टर्फ बसवता येईल, त्यासाठी कोणकोणत्या चाचण्या घ्याव्या लागतील, याची माहिती नमूद करणार आहेत.

Web Title: Pave the way for the installation of astroturf in the hockey stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.