वर्गणी न दिल्याने तरुणाच्या डोक्यात घातली फरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:26 AM2019-08-30T10:26:39+5:302019-08-30T10:28:13+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गणेशोत्सवाची वर्गणी दिली नसल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात फरशी मारून त्याला गंभीर जखमी ...

Pavement placed in the young man's head for non-payment | वर्गणी न दिल्याने तरुणाच्या डोक्यात घातली फरशी

वर्गणी न दिल्याने तरुणाच्या डोक्यात घातली फरशी

Next
ठळक मुद्देवर्गणी न दिल्याने तरुणाच्या डोक्यात घातली फरशीतिघांवर पोलिसांत गुन्हा : राजारामपुरी यशवंतनगरातील प्रकार

 




लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गणेशोत्सवाची वर्गणी दिली नसल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात फरशी मारून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला. अर्जुन मनोहर शिंदे (वय २४) असे जखमीचे नाव असून, बुधवारी (दि. २८) रात्री उशिरा राजारामपुरी १४ व्या गल्लीतील यशवंतनगरमध्ये हा प्रकार घडला. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
राज संजय जगताप (वय १९), युवराज आनंद जगताप (२२), रोहित रवी साळोखे (१९, सर्व रा. यशवंतनगर, राजारामपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती, अर्जुन शिंदे हा यशवंतनगरात राहतो. बुधवारी रात्री त्यांच्या घरात राज जगताप, युवराज जगताप आणि रोहित साळोखे हे तिघेजण आले. त्या तिघांनी अर्जुनकडे मंडळाच्या गणेशोत्सवाची वर्गणी मागितली. त्याने आता आपल्याकडे पैसे नाहीत, ही वर्गणी २ सप्टेंबरला मंडळाचे अध्यक्ष युवराज सुरेश शिंदे यांच्याकडे देतो, असे त्यांना सांगितले; मात्र त्या तिघांनी वर्गणी आताच द्या, असा आग्रह करत वाद घातला. यातून अर्जुन व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी होऊन, अर्जुनच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी हे भांडण सोडविले. जखमी अर्जुन शिंदेला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित राज, युवराज जगताप आणि रोहित साळोखे या तिघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
तानाजी

 

Web Title: Pavement placed in the young man's head for non-payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.