पवारसाहेब, राष्ट्रवादी-भाजपच्या ‘सेटिंग’मध्ये तुम्हीच लक्ष घाला : पतंगराव कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 08:25 PM2017-11-03T20:25:47+5:302017-11-03T20:51:42+5:30
सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे.
सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. सांगलीत मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला’, अशी टोलेबाजी काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली.
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज शेती पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पवार यांच्यासह भाजपचे खासदार संजय पाटील, राष्टÑवादीचे नेते आमदार जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील व धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, कुंडलच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड उपस्थित होते. स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘मिलीभगत’वर बोट ठेवत पतंगरावांनी राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांना कोपरखळ्या हाणल्या.
पतंगरावांनी एकीकडे भाजपवर हल्ला चढवत दुसरीकडे राष्ट्रवादीला टोले दिले. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी नुकतेच कृषी प्रदर्शन आणि स्वत:च्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले. शरद पवार यांच्याहस्ते गुरुवारी त्यांचा गौरव झाला. जिल्'ातील सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी निमंत्रण दिले होते. मात्र पतंगरावांना दिले नव्हते. ही खंत व्यक्त करत पतंगराव म्हणाले की, आरं, घरचं सोडून पळत्याच्या मागे का लागताय? जिल्'ाच्या राजकारणातल्या वावटळात ३३ वर्षे काम केलंय. आमच्यात भाजप आणि राष्टÑवादी एकत्र येत असतात.
सगळे मिळून माझ्याविरोधात बैठका घेतात. भविष्यात मात्र घोटाळा करून चालणार नाही. लोकांची अपेक्षा आहे, पवारांनी नेतृत्व करावं. आपण सारे एक विचाराचे, एका दिशेचे आहोत. या कार्यक्रमाला मला बोलवलं, मी आलो. मी कुठं आड येत नाही आणि बोलावल्याशिवाय कुठं जात नाही. मला अरुणने बोलावलं नाही. पंख लहान होते, त्यावेळेला मला जी. डी. बापू लाड यांनीच मदत केली. १९८५ ला बापूंनी पाठिंबा दिल्यामुळेच मी आमदार झालो. कुंडलमध्ये माझं शिक्षण झालं. बालपण गेलं. तिथली माणसं माझ्या हक्काची आहेत. मी लोकांच्या जीवावर आहे, आता पंख मोठे झालेत. माझं पंख छाटायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला जमणार नाही.
ते म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारला पश्चिम महाराष्ट्राचे वावडे आहे. मी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो, ‘तुमचं काय दुखणं आहे? आमची फाईल आली की फुली का मारता?’
‘खरं तर आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. आमच्या जिल्'ात मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला,’ असा टोला त्यांनी मारला. त्यावर खासदार संजयकाकांचा त्रास आहे का? असे विचारल्यावर, ‘'ो नुसता घुलवतो. माणसं गोळा करून जाहिरातबाजी करतो. त्याचा मला त्रास नाही. त्याचं माझ्याबाबतीत काही वाकडं नसतं. आम्ही यापूर्वी एकत्र काम केलंय,’ असे त्यांनी सांगितले.
पतंगरावांनी शेकापचे आमदार जयंत पाटील ‘सर्वांत श्रीमंत शेकापवाला’ असल्याचे सांगून त्यांनाही चिमटा काढला.