Lok Sabha Election 2019 पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पवारांकडून कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 01:13 AM2019-04-03T01:13:05+5:302019-04-03T01:14:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी मिळाले आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी मिळाले आहेत.
पवार यांनी दुपारी कोल्हापुरात आल्यापासून कोणकोणत्या तालुक्यांत कोणकोणते राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षविरोधी काम करीत आहेत, त्याची माहिती घेतली आहे. त्यातून अशा सर्व विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत. यावरूनच कोल्हापूरची जागा पवार यांनी प्रतिष्ठेची मानली असल्याचे समजते.
राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्याकडे पवार
यांनी कोल्हापूर, इचलकरंजीतील नगरसेवकांबाबत विचारणा केली. यावेळी आवाडे यांनी बहुतांशकाँग्रेसचे नगरसेवक हे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात असल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. यावर ‘त्यांच्यावर कारवाई करणार कीनाही,’ अशी विचारणा शरद पवार यांनी केली असता, त्याबाबत ‘प्रदेश’कडून निर्णय घेतला जाईल, असे आवाडे यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
त्यातूनच आजºयातील जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी यांनाही पवार यांनी भेटायला बोलाविले असल्याचे समजते.
पर्यायाची चाचपणी
माजी आमदार पी. एन. पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून आमदार सतेज पाटील यांच्यामुळे कितपत नुकसान होऊ शकते याची माहिती घेऊन त्याला पर्याय काय दिला पाहिजे, याची ही चाचपणी पवार यांनी केली. एकीकडे राष्ट्रीय, राज्य पातळीवर दोन्ही काँग्रेस एकत्रित येऊन काम करीत असताना केवळ स्थानिक संदर्भ घेऊन पक्षविरोधी काम करीत असेल, तर त्यांच्याबाबतीत कडक भूमिका स्वीकारण्याची सूचना संबंधितांना दिल्याची चर्चा
यावेळी सुरू होती.