‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:22 AM2020-12-22T04:22:45+5:302020-12-22T04:22:45+5:30

भूविकासच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली; मात्र अद्याप पदरात काहीच पडलेले ...

Pay the debts of the retired employees of ‘Bhuvikas’ | ‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी द्या

‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी द्या

Next

भूविकासच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली; मात्र अद्याप पदरात काहीच पडलेले नाही. यामध्ये नुकसानभरपाई, ग्रॅज्युईटी, रजा पगार, वाढीव वेतनाचा समावेश आहे. साधारणत: १२ कोटी ५० लाख कर्मचाऱ्यांची देय रक्कम आहे.

भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना ओटीएस योजना लागू केल्याने शासनाकडून ७०० कोटी रुपये येणे आहे. कोल्हापूर जिल्ह्याची ओटीएस रक्कम ९२ कोटी आहे आणि कर्मचाऱ्यांचे देय रक्कम १२ काेटी ५० लाख रुपये आहे. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांची देय रक्कम द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी सी. ए. पोवार, संजय साळोखे, बंडा आळवेकर, शामराव भावके, पी. वाय. शिंदे, व्ही. डी. शिंदे, बी. व्ही. वाळके, व्ही. बी. निंबाळकर, नारायण जाधव, गुलाब पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देय रक्कम शासनाने द्यावी. या मागणीचे निवेदन सोमवारी कर्मचारी संघटनेने जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली. (फाेटो-२११२२०२०-कोल-भूविकास बँक)

- राजाराम लोंढे

Web Title: Pay the debts of the retired employees of ‘Bhuvikas’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.