युनिटप्रमाणे वीज बिले द्या, सवलत नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:56+5:302021-02-06T04:43:56+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : साहेब, युनिटप्रमाणे वीज बिले दुरुस्त करून द्या. आम्हाला तुमची पन्नास टक्क्यांची सवलत नको. ॲाफिसमध्ये बसून ...

Pay electricity bills as per unit, no discount | युनिटप्रमाणे वीज बिले द्या, सवलत नको

युनिटप्रमाणे वीज बिले द्या, सवलत नको

Next

पोर्ले तर्फ ठाणे : साहेब, युनिटप्रमाणे वीज बिले दुरुस्त करून द्या. आम्हाला तुमची पन्नास टक्क्यांची सवलत नको. ॲाफिसमध्ये बसून शेतीपंपाच्या वीज बिलाची वाढीव आकारणी तेवढी थांबवा. महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या तक्रारींना जुमानत नसल्याची खंत शेतीपंपधारकांनी व्यक्त केली. आशा अनेक तक्रारीचा पाढा वाचत शेतीपंपधारकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला.

घरगुती वीज बिले वेळेत भरूनसुद्धा मागील थकबाकी दाखवत बिले वाढून येत आहे. महावितरणचा एकही कर्मचारी पंपाचे रीडिंग न घेता मोघम आकडेवारीवर बिले आकारणी होत आहे. पावसाळ्यात पंप सुरू नसतानाही वीज बिले येतात. महापुरादरम्यान पाण्यात बुडलेली मीटर बदलून दिलेली नाहीत. वीज बिले वेळेत भरले नाही तर वीज तातडीने बंद करता मग तक्रारी अर्जांचे त्वरित का निवारण होत नाही.

आसुर्ले-पोर्ले येथील नृसिव्ह सरस्वती बँकेत शासनाने माहे सप्टेंबर २०२० पर्यंतची ५० टक्के बिले भरल्यास ५० टक्के सवलती आणि विविध योजनांची माहिती शेतीपंपधारकांना अधिकाऱ्यांनी दिली. पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील वीज कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील शेतीपंपधारकांची बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

याप्रसंगी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, बाजार समितीचे माजी सभापती परशराम खुडे, उपकार्यकारी अभियंता अमोल राजे, सहाय्यक लेखापाल रोहित कांबळे, कनिष्ठ अभियंता प्रवीण पाटील, सदाशिव घोलप, उत्तम शिंदे (पोर्ले/ ठाणे), भरत शिंदे (पिंपळे), सनी पाटील, विकास पाटील( आसुर्ले), सदाशिव पाटील (वाघवे) आदींसह शेतीपंपधारक उपस्थित होते.

Web Title: Pay electricity bills as per unit, no discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.