ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतन द्या अन्यथा आंदोलन छेडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:16+5:302021-06-09T04:29:16+5:30
शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीने जुन्या ३४ कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करता संपूर्ण वेतन द्यावे, अन्यथा ७३ कर्मचाऱ्यांना सोबत ...
शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीने जुन्या ३४ कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करता संपूर्ण वेतन द्यावे, अन्यथा ७३ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणाला बसू असा इशारा महाडिक गटाच्यावतीने माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी ग्रामपंचायतीला दिला. यासंदर्भातील निवेदन ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. भोगम व उपसरपंच सुरेश यादव यांना देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीनेही गिरीश फोंडें व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना निवेदन दिले आहे.
शिरोली ग्रामपंचायतीने ३४ कर्मचाऱ्यांची चार हजारांपासून ते दहा हजार रुपयांपर्यत वेतन कपात केली आहे. यावरून ग्रामपंचायतमधील विरोधी महाडिक गट आक्रमक झाला. यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी ग्रामविकास अधिकारी भोगम यांना कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केल्याने गावची बदनामी होत आहे असे सांगत धारेवर धरले. तर ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील यांनी कामगारांना संपूर्ण वेतन द्या,
अन्यथा आम्ही कामगारांना घेऊन आंदोलन करु, असा इशारा दिला. यावर ग्रामविकास
अधिकारी भोगम यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार वेतन कपात केली असल्याचे सांगितले. यावेळी
ग्रामपंचायत सदस्य सलीम महात, बाजीराव पाटील, बाबासाहेब कांबळे, पुष्पा
पाटील, मीनाक्षी खटाळे, श्वेता गुरव, संध्याराणी कुरणे, विनायक कुंभार, धीरज पाटील, माजी
पंचायत समिती सदस्य बबन संकपाळ दीपक यादव, नीलेश पाटील, आरीफ सर्जेखान,
बाळासाहेब पाटील, सूर्यकांत खटाळे, विजय जाधव, निशिकांत पाटील, अरुण पाटील व
कर्मचारी उपस्थित होते.
चौकट : ग्रामविकास अधिकाऱ्यांची जाहीर माफी
ग्रामविकास अधिकारी भोगम हे महिला कर्मचाऱ्यांना उध्दट बोलत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी केली. यावर भोगम यांनी कर्मचाऱ्यांना उद्धटपणे बोललो असेल किंवा अनवधानाने चुकीचे बोललो असेल तर जाहीर माफी मागतो, असे सांगितले.
फोटो ०७ शिरोली निवेदन
शिरोली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करता संपूर्ण वेतन द्यावे, अशी मागणी महाडिक गटाच्यावतीने माजी उपसरपंच कृष्णात करपे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. भोगम व उपसरपंच सुरेश यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.