निम्मे बिल भरा, शंभर टक्के थकबाकीमुक्त व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:25+5:302021-02-06T04:45:25+5:30

कोल्हापूर : कृषिपंपासाठी निर्लेखन, व्याज, विलंब आकाराची माफी दिल्यानंतर आता महावितरणने कृषिपंप ग्राहकांसाठी उर्वरित थकबाकी फेडण्यासाठी ५० टक्के ...

Pay half the bill, be one hundred percent debt free | निम्मे बिल भरा, शंभर टक्के थकबाकीमुक्त व्हा

निम्मे बिल भरा, शंभर टक्के थकबाकीमुक्त व्हा

Next

कोल्हापूर : कृषिपंपासाठी निर्लेखन, व्याज, विलंब आकाराची माफी दिल्यानंतर आता महावितरणने कृषिपंप ग्राहकांसाठी उर्वरित थकबाकी फेडण्यासाठी ५० टक्के सवलतीची योजना लागू केली आहे. निम्मे बिल भरून शंभर टक्के थकबाकीमुक्त होण्याची संधी या योजनेमुळे मिळणार आहे. या योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ९०४ ग्राहकांचे २१५ कोटी ३६ लाख रुपये माफ होऊ शकतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ९०४ कृषी ग्राहकांकडे ४७७ कोटी ६६ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे ४६ कोटी ९३ लाख रुपये नुकतेच माफ करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नेते एन. डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली इरिगेशन फेडरेशनच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे. आता उरलेल्या मूळ थकबाकीच्या ४३० कोटी ७२ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २१५ कोटी ३६ लाखांची रक्कम माफ केली जाईल, अशी घोषणा केली आहे.

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे स्वतंत्र धोरण ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून नुकतेच जाहीर झाले आहे. यात कृषिपंपांसह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

चौकट ०१

असा मिळेल लाभ

ज्या कृषी ग्राहकांनी या योजनेत एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणे देखील आवश्यक आहे.

Web Title: Pay half the bill, be one hundred percent debt free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.