बीएलओ, पर्यवेक्षक यांना मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:35+5:302021-04-03T04:20:35+5:30

चंदगड : चंदगड तालुक्यात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी २०१७ पासून गेली पाच वर्षे केंद्रस्तरीय मतदार अधिकारी तथा बीएलओ व ...

Pay honorarium to BLO, Supervisor | बीएलओ, पर्यवेक्षक यांना मानधन द्या

बीएलओ, पर्यवेक्षक यांना मानधन द्या

googlenewsNext

चंदगड :

चंदगड तालुक्यात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी २०१७ पासून गेली पाच वर्षे केंद्रस्तरीय मतदार अधिकारी तथा बीएलओ व त्यांच्यावर निरीक्षणासाठी नेमलेले पर्यवेक्षक विनावेतन काम करत आहेत. मानधन आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असलेल्या प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, केंद्रप्रमुख आदींनी निराशा अंती तहसीलदार विनोद रणवरे यांना मानधन मागणीचे निवेदन दिले.

वार्षिक ५ हजार मानधन देय असताना गेल्या ५ वर्षात एक रूपया ही मानधन मिळालेले नाही. आपल्या हक्काच्या सुटीच्या दिवशी मतदार याद्यांची कामे करण्याबरोबरच महिन्यातून किमान दोन वेळा व निवडणूक काळात आठवड्यातून किमान एकदा तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारण्यात त्यांचे हजारो रुपये खर्च झाले आहेत व होत आहेत.

आदेश देताना वार्षिक ५ हजार रुपये मानधन असल्याचे सांगण्यात आले होते. २०१७ पूर्वी काही वेळा ते दिले होते. तथापि, गेल्या पाच वर्षात मानधन मिळालेच नाही. ते शासनाकडूनचे आले नाही की मध्येच कुठे गायब झाले? याबद्दल बीएलओ, पर्यवेक्षकांसह जि. प., पं. स. कर्मचाºयांमध्ये उलट-सुटल चर्चा सुरु आहे.

शेवटी पाच वर्षे वाट पाहून सर्व कर्मचाºयांच्या स्वाक्षरीनिशी मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. तहसीलदारांतर्फे नायब तहसीलदार संजय राजगोळे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी केंद्रप्रमुख वाय. के. चौधरी, डी. आय. पाटील, जी. व्ही. जगताप, डी. जी. कांबळे, भैरू भोगण, यशवंत कांबळे, धोंडीबा कुट्रे, नबीसाहब उस्ताद, सुजाता मुतगेकर, माया पाटील, ज. ल. पाटील, अर्जून पाटील, अजित पाटील, सागर मोरे आदींसह बीएलओ व पर्यवेक्षक आदींच्या स्वाक्षºया आहेत.

---------------------------

यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणूक, मतदार यादी पुर्नरिक्षण, जनगणना यासारख्या कामाचे मानधन बºयाच वेळा गायब झाल्याचा अनुभव पाठीशी असलेले कर्मचारी हे मानधन तरी मिळेल का ? या संभ्रमात आहेत

---------------------------

फोटो ओळी : नायब तहसिलदार संजय राजगोळे यांना मागण्याचे निवेदन देताना केंद्रप्रमुख वाय. के. चौधरी, डी. आय. पाटील, भैरू भोगण, यशवंत कांबळे, धोंडीबा कुट्रे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०२०४२०२१-गड-०८

Web Title: Pay honorarium to BLO, Supervisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.