राज्यातील वृद्ध खेळाडूंना मानधन द्या, ऋतुराज पाटील यांची मागणी : क्रीडा मंत्र्यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 01:06 PM2021-03-04T13:06:43+5:302021-03-04T13:09:05+5:30

Wrestling RururajPatil Kolhapur- हिंद केसरी,महाराष्ट्र केसरीसह राज्यातील सर्व वृद्ध खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारे मानधन रक्कम वाढवून ती नियमित द्यावी. गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ द्यावे अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. ​​​​​​​

Pay honorarium to old players in the state, demand of Rituraj Patil: Meeting of Sports Minister | राज्यातील वृद्ध खेळाडूंना मानधन द्या, ऋतुराज पाटील यांची मागणी : क्रीडा मंत्र्यांची घेतली भेट

राज्यातील वृद्ध खेळाडूंना प्रलंबित मानधन त्वरित द्यावे या मागणीसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची बुधवारी भेट घेतली.

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील वृद्ध खेळाडूंना मानधन द्याऋतुराज पाटील यांची मागणी : क्रीडा मंत्र्यांची घेतली भेट

कोल्हापूर : हिंद केसरी,महाराष्ट्र केसरीसह राज्यातील सर्व वृद्ध खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारे मानधन रक्कम वाढवून ती नियमित द्यावी. गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ द्यावे अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली.

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरी व अन्य खेळातील वृद्ध खेळाडूंना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. कोरोना काळात ते गेल्या आठ महिन्यांपासून थकीत आहे. ते नियमितपणे द्यावे. अशी मागणी आमदार पाटील यांनी क्रीडा मंत्री केदार यांची भेट घेऊन केली. महाराष्ट्र व हिंद केसरी मल्लांना प्रतिमहिना सहा, तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना चार आणि राष्ट्रीय खेळाडूंना अडीच हजार मानधन दिले.

हे अत्यल्प आहे. त्यामुळे ते वाढवून त्वरित द्यावे. गेल्या जुलै २०२० पासून मानधन या ज्येष्ठ खेळाडूंना मिळालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी क्रीडा मंत्री केदार यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन क्रीडामंत्री केदार यांनी आमदार पाटील यांना दिले.

 

Web Title: Pay honorarium to old players in the state, demand of Rituraj Patil: Meeting of Sports Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.