लस आणि थकीत मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:01+5:302021-07-17T04:20:01+5:30
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या टोपे यांची या दोघांनीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी अरूण जाधव उपस्थित होते. जिल्ह्याला रोज ...
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या टोपे यांची या दोघांनीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी अरूण जाधव उपस्थित होते.
जिल्ह्याला रोज ५० हजार लसीचे डोस मिळावेत, पहिल्या लाटेमध्ये काम केलेल्या जादा मनुष्यबळाचे पाच कोटी रुपये थकीत आहेत, ते अदा करावेत, दुसऱ्या लाटेमध्ये जादा मनुष्यबळ लागणार आहे, त्यासाठी तीन कोटी रुपये द्यावेत, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून पुढील सहा महिन्यांसाठी ३० कोटी रुपये मिळावेत, ससंभाव्य पूरस्थितीचा विचार करता वैद्यकीय पथके, जादा मनुष्यबळ, औषधे, ॲन्टिजन किट यासाठी आवश्यक असणारे दोन कोटी रुपये मिळावेत, आरोग्य विभागाकडील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील कंत्राटी सफाई कामगारांचे गेले दोन वर्षे मानधन थकलेले आहे. यासाठी तीन कोटी रुपये अदा करावेत, अशा निवेदनातून मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
१६०७२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य सभापती वंदना जाधव यांनी शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अरुण जाधव उपस्थित होते.