'ब्रिक्स'कडून कामगारांना विमा दाव्याची रक्कम अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 06:37 PM2021-04-30T18:37:53+5:302021-04-30T18:38:53+5:30

SugerFactory Kolhapur : हरळी (ता.गडहिंग्लज ) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ५ कामगारांना विमा दाव्याची एकूण ५ लाख ४६ हजार ३७२ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली,अशी माहिती ब्रिक्स कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Pay insurance claims to workers from BRICS | 'ब्रिक्स'कडून कामगारांना विमा दाव्याची रक्कम अदा

हरळी ( ता.गडहिंग्लज ) येथे सुनिता राजेंद्र लोहार यांना वसंत गुजर यांच्याहस्ते धनादेश देण्यात आला.यावेळी प्रशासन अधिकारी शाम हरळीकर,वित्त अधिकारी आनंदा लोहार आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे'ब्रिक्स'कडून कामगारांना विमा दाव्याची रक्कम अदारक्कम मयत कामगारांच्या वारस व अपघात जखमी कामगारांना

गडहिंग्लज : हरळी (ता.गडहिंग्लज ) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ५ कामगारांना विमा दाव्याची एकूण ५ लाख ४६ हजार ३७२ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली,अशी माहिती ब्रिक्स कंपनीचे सरव्यवस्थापक वसंत गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे, युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीकडे कारखान्याच्या कामगारांचा अपघात वीमा उतरवला होता.त्यातील दाव्यांपोटी वीमा कंपनीकडून प्राप्त विम्याची रक्कम मयत कामगारांच्या वारस व अपघात जखमी कामगारांना देण्यात आली. दिवंगत राजेंद्र कल्लाप्पा लोहार यांच्या पश्चात पत्नी सुनीता राजेंद्र लोहार यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

इरगोंडा पाटील यांना १८ हजार २६० रुपये, अशोक कुंभार यांना १० हजार १८१रुपये, दत्तात्रय वाघराळकर यांना ९ हजार ७४२ रुपये, यशवंत गुरव यांना ८ हजार १८९ रुपये इतकी रक्कम देण्यात आली. यावेळी प्रशासन अधिकारी शाम हरळीकर,वित्त अधिकारी आनंदा लोहार आदी उपस्थित होते.
 

Web Title: Pay insurance claims to workers from BRICS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.