थकीत एफआरपी व्याजासह द्या, शेतकरी संघटनांचा साखर आयुक्तांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:27 PM2019-09-23T18:27:18+5:302019-09-23T18:32:08+5:30

आगामी हंगामात एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा घाट साखर कारखान्यांनी घातला असून, ते कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिला. त्याचबरोबर मागील हंगामातील थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह देण्याची मागणीही त्यांनी केली.

Pay with outstanding FRP interest, alert farmers' commissioners to sugar commissioners | थकीत एफआरपी व्याजासह द्या, शेतकरी संघटनांचा साखर आयुक्तांना इशारा

आगामी हंगामात एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी १४ दिवसांत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली. यावेळी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, बी. जी. पाटील, आदी उपस्थित होते. 

Next
ठळक मुद्देथकीत एफआरपी व्याजासह द्या शेतकरी संघटनांचा साखर आयुक्तांना इशारा

कोल्हापूर : आगामी हंगामात एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा घाट साखर कारखान्यांनी घातला असून, ते कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिला. त्याचबरोबर मागील हंगामातील थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह देण्याची मागणीही त्यांनी केली.

आंदोलन अंकुश, जय शिवराय किसान मोर्चा व बळीराजा शेतकरी संघटना यांनी सोमवारी साखर आयुक्त गायकवाड यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. कायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे; पण कारखानदारांनी कायद्याला बगल देत तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा घाट घातला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येणार असून, ते कदापि खपवून घेणार नाहीत.

तोडणी-वाहतूक, पंधरवडा एफआरपी अहवालात व्याजाची रक्कम देणे बंधनकारक आहे. याबाबतही चर्चा झाली. यावेळी धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, बी. जी. पाटील, मनोज राजगिरे, दत्तात्रय जगदाळे, विकास शेसवरे, सुनील चोपडे, आदी उपस्थित होते.

 

Web Title: Pay with outstanding FRP interest, alert farmers' commissioners to sugar commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.