पोलिसांना भरा आता तब्बल २१ लाख रुपये दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:46 PM2020-04-27T12:46:54+5:302020-04-27T12:50:32+5:30
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, क्रेनचे १०० रुपये व २०० रुपये दंड असे प्रत्येकी ३०० रुपये भरून परत
कोल्हापूर : कोरोना विषाणू्च्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी सरकारने संचारबंदी व लॉकडाऊन केले होते. त्यात विनाकारण फिरणाºया सुमारे सात हजार दुचाकी शहर वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्या ४ मेपासून ३०० रुपये इतका दंड भरून व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर मूळ मालकांच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे २१ लाखांचा दंड वसूल होणार आहे. ज्यांचा विमा, वाहन चालविण्याचा परवाना, आदी कागदपत्रांची पूर्तता नसणार आहे, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, क्रेनचे १०० रुपये व २०० रुपये दंड असे प्रत्येकी ३०० रुपये भरून परत दिल्या जाणार आहेत. याकरिता शहर वाहतूक शाखेतर्फे वाहन ताब्यात घेतल्यानंतर नोंदणीनुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ही वाहने ४ मे ते १३ मे २०२० दरम्यान दोन प्रहरांत अर्थात सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत व दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परत दिली जाणार आहेत, अशी माहिती पत्रकाद्वारे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
----------
दुचाकी परत देण्याचे वेळापत्रक असे,
(वाहन रजि. क्रमांकानुसार) ४ मे- ०००१ ते ०५००, ०५०१ ते १०००), ५ मे - १००१ ते १५००, १५०१ ते २०००, ६ मे -२००१ ते २५००, २५०१ ते ३०००, ७ मे - ३००१ ते ३५००, ३५०१ ते ४०००, ८ मे - ४००१ ते ४५००, ४५०१ ते ५०००, ९ मे- ५००१ ते ५५००, ५५०१ ते ६०००, १० मे- ६००१ ते ६५००, ६५०१ ते ७०००, ११ मे- ७००१ ते ७५००, ७५०१ ते ८०००, १२ मे - ८००१ ते ८५००, ८५०१ ते ९०००, १३ मे - ९००१ ते ९५००, ९५०१ ते ९९९९ .
वाहने जमा असलेली ठिकाणे
पोलीस मुख्यालय (मोटार वाहन विभाग), जैन बौर्डिंग, शहर वाहतूक शाखेशेजारी, चित्रदुर्ग मठ, दसरा चौक, महालक्ष्मी जिमखाना, शहाजी कॉलेज, शहर वाहतूक शाखा, दसरा चौक
ही कागदपत्रे आवश्यक
आर. सी. नोंदणी (आर.सी.), लायसेन्स, विमा (इन्श्युरन्स), वाहन ताब्यात घेण्यासाठी बाँड पेपर आणि दंडाची रक्कम, आदींची पूर्तता केलेली पावती त्या-त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दाखविल्यानंतर वाहने ताब्यात दिली जाणार आहेत. उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.