डिजिटल हयातीचे दाखले पेन्शनधारकांनी २८पर्यंत द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 12:01 AM2017-02-08T00:01:41+5:302017-02-08T00:01:41+5:30
भविष्यनिधी कार्यालय : आधारशी जोडून आॅनलाईन करणे आवश्यक
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील कर्मचारी भविष्य्निधी उपक्षेत्रीय कार्यालयामार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व पेन्शनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखले नवीन पद्धतीप्रमाणे आधारकार्डशी संलग्न करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र आॅनलाईन करणे आवश्यक आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्राकरिता आपला पीपीओ क्रमांक, मोबाईल फोन, बँक पासबुक व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी आहे.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र रजिस्ट्रेशनची कार्यवाही सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या दिवशी कार्यालयामध्ये सुरू राहणार आहे. रजिस्ट्रेशन करीत असताना आपल्या पीपीओ क्रमांकावरील सर्व माहिती ही आधारकार्डप्रमाणे असणे आवश्यक आहे. म्हणजेच पेन्शनर्सचे किंवा सभासदाचे नाव, जन्म तारीख, इत्यादी माहिती तसेच आधारकार्ड व पेन्शन डाटामधील माहिती ही एकच असली पाहिजे; अन्यथा याचे रजिस्ट्रेशन पूर्ण होत नाही.
सर्व पेन्शनधारक गावातील किंवा आपल्या राहत्या ठिकाणच्या जवळपास उपलब्ध असलेल्या ‘महा-ई सेवा केंद्र’ व ‘सुविधा कक्ष’ यांच्यामार्फत याचे रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. या केंद्राचे पत्ते ६६६.ीस्रा्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल.ाङ्म१स्रील्ल२्रङ्मल्ली१२ / ’ङ्मूं३ी्नीी५ंल्लस्र१ेंंल्लूील्ल३ी१२ं३ ँ३३स्र://६६६.ेङ्मुीङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल/ेङ्म’६ीु/स्र४ु’्रूंस्रस्र/४३्र’्र३८/५्री६२ी५ं‘ील्ल१िं.ं२स्र७ या लिंकवर उपलब्ध आहेत. आपल्या नजीकचे केंद्र कोणते हे जाणून घेण्यासाठी पेन्शनधारक या लिंकवरून माहिती मिळवू शकतात. डिजिटल प्रमाणपत्र रजिस्टर करीत असताना पीपीओ क्रमांक हा १३ अंकी असणे आवश्यक आहे. उदा. : पीपीओ क्र.१०२५६० असा असेल तर रजिस्टर करताना ढवङडछ00102560 असा नमूद करावा.
रजिस्ट्रेशनची कार्यवाही सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या दिवशी
रजिस्ट्रेशन करीत असताना आपल्या पीपीओ क्रमांकावरील सर्व माहिती ही आधारकार्डप्रमाणे असणे आवश्यक