भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:27 AM2021-01-16T04:27:51+5:302021-01-16T04:27:51+5:30

सर्वच गावांत राजकीय नेते आणि उमेदवार मतदान केंद्राबाहेर उपस्थित होते. वयस्क मतदारांना वाहनांतून आणून सोडले जात होते. गंगापूर, आदमापूर, ...

Peaceful polling for 41 gram panchayats in Bhudargad taluka | भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

Next

सर्वच गावांत राजकीय नेते आणि उमेदवार मतदान केंद्राबाहेर उपस्थित होते. वयस्क मतदारांना वाहनांतून आणून सोडले जात होते. गंगापूर, आदमापूर, खानापूर, म्हसवे येथे शांततेत मतदान झाले. खानापूर, गंगापूर, म्हसवे, नितवडे येथे मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाची झाली.

सकाळी सात वाजेपासून अत्यल्प प्रमाणात, तर नऊ नंतर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी दीड वाजेपर्यंत ६५.५९ टक्के, तर तीन वाजेपर्यंत ८०.८५ टक्के मतदान झाले. १६,७७६ पुरुषांनी, तर १६,६७४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी मतदान करण्यात महिला आघाडीवर होत्या. मतदानावेळी त्यांच्यात कमालीचा उत्साह जाणवत होता.

३४१ जागांसाठी ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ११५ मतदान केंद्रांवर ६९० कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.

तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ४१ ग्रामपंचायतींसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४१ हजार ५४३ मतदार आहेत.

फोटो: १) सोनाबाई पांडुरंग वारके (वय ९०), खानापूर येथे मतदानाचा हक्क बजावताना.

२) खानापूर येथे कृष्णाजी देवजी पाटील (वय १०३) यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Peaceful polling for 41 gram panchayats in Bhudargad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.