गारगोटी शहरात कोरोना अहवाल असल्याखेरीज प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:14+5:302021-05-11T04:26:14+5:30
गारगोटी शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचे रुग्ण दररोज १५ ते २० ने वाढत आहेत. त्यामुळे ...
गारगोटी शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचे रुग्ण दररोज १५ ते २० ने वाढत आहेत. त्यामुळे गारगोटी शहरामध्ये दि. ११ ते १५ तारखेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन आहे. गारगोटी शहरातील लसीकरण केंद्रावर १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणाची मोहीम सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, गोवा, इचलकरंजी व गांधीनगर येथील लोक लसीकरणासाठी गारगोटी लसीकरण केंद्रामध्ये येत आहेत. त्यामुळे गारगोटीमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे गारगोटी शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गारगोटी शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा कोरोना रिपोर्ट (अँटिजन किंवा आरटीपीसीआर) निगेटिव्ह असणाऱ्यांनाच दि. ११ ते १५ मे पर्यंत शहरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.