गारगोटी एस. टी. आगाराचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:35+5:302021-07-17T04:20:35+5:30

गारगोटी : गारगोटी एस. टी. आगाराला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बसस्थानक परिसरात सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात ...

Pebble S. T. Agara's golden jubilee anniversary celebrated with enthusiasm ... | गारगोटी एस. टी. आगाराचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा...

गारगोटी एस. टी. आगाराचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा...

googlenewsNext

गारगोटी : गारगोटी एस. टी. आगाराला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बसस्थानक परिसरात सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आगारातील ६० बसेस रंगवून सजविण्यात आल्या होत्या. सर्व बसेसचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. ग्राहक पंचायतीचे जिल्हा ऊर्जा विषय समिती प्रमुख प्रशांत पुजारी यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक यांना ग्राहक संघटनेमार्फत गुलाबपुष्प देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संग्रामसिंह कडव यांच्या हस्ते केक कापण्यात आला तर व्यापारी संघाचे विश्वनाथ घाटगे यांच्या हस्ते गाडीचे पूजन करण्यात आले. बसस्थानक परिसरात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रशांत पुजारी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, पत्रकार किशोर आबिटकर, सर्पमित्र अवधूत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुरेश सूर्यवंशी, प्रा. आनंद चव्हाण यांच्या हस्ते प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वागत आगारप्रमुख दिलीप ठोंबरे यांनी केले. प्रा. आनंद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश कारेकर, प्रमोद सोळसे, रंगराव खामकर, कार्यशाळा अधीक्षक अनिकेत चौगले, बसस्थानक प्रमुख रुपाली तोंदले, रोहन देसाई, महेश सावंत, शशिकांत कुंभार, प्रवीण म्हाडगुत, मच्छिंद्र डोंगे, चंद्रकांत मोरे, अजित कोळी यांच्यासह आगारातील सर्व चालक, वाहक, कर्मचारी, तंत्रज्ञ उपस्थित होते.

१६ गारगोटी एस. टी. पूजन

फोटो ओळ

एस. टी. बसचे पूजन प्रशांत पुजारी, दिलीप ठोंबरे, प्रकाश वास्कर आदींनी केले.

Web Title: Pebble S. T. Agara's golden jubilee anniversary celebrated with enthusiasm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.