मोटारसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:15+5:302021-03-22T04:23:15+5:30

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचगंगा फॅक्टरी रोड ते मलाबादेनगर या मार्गावर सुशांत हा दुधाची किटली घेऊन गो-शाळेतील दूध आणण्यास ...

Pedestrian killed in motorcycle-tractor collision | मोटारसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठार

मोटारसायकल ट्रॅक्टर धडकेत पादचारी ठार

Next

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचगंगा फॅक्टरी रोड ते मलाबादेनगर या मार्गावर सुशांत हा दुधाची किटली घेऊन गो-शाळेतील दूध आणण्यास निघाला होता. त्यावेळी समोरून आलेल्या मोटारसायकल (एमएच- ०९ सीएन- ६३१३) ने त्याला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तेथून ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसही त्याचा धक्का लागल्याची चर्चा सुरू होती. घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळावरून सुशांत यास आय.जी.एम. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात स्थानिक नगरसेवक किसन शिंदे, मित्र परिवार व नातेवाइकांनी गर्दी केली होती. सुशांत यांचा विवाह झाला असून, त्यांना सात महिन्यांचा मुलगा आहे.

दरम्यान, रात्री उशिरा मोटारसायकल व चालक तसेच उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच २१ किव्ह १६७४) , ट्रॉली (एमएच २३ किव्ह ३८१८) व ट्रॉली (एमएच २३ किव्ह ३८१९) सहचालकासही ताब्यात घेतले आहे.

(फोटो)

सुशांत टिंबुगडे

Web Title: Pedestrian killed in motorcycle-tractor collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.