अन्नदात्याच्या न्यायासाठी कोल्हापुरातील साहित्यिकांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 06:30 PM2020-12-17T18:30:28+5:302020-12-17T18:37:03+5:30
FarmarStrike, literature, kolhapur अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या चारही सीमांवर गेल्या २३ दिवसांपासून न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता कोल्हापुरातील चाळीसहून अधिक साहित्यीक गुरुवारी एकत्र आले आहेत.
कोल्हापूर : अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या चारही सीमांवर गेल्या २३ दिवसांपासून न्यायासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता लेखणीही पुढ सरसावली आहे.
कोल्हापुरातील चाळीसहून अधिक साहित्यीकांनी गुरुवारी एकत्र येऊन या आंदोलनात सक्रीय होऊन मातीचे ऋण फेडण्याचा निश्चय केला. नुसता पाठींबा देऊन न थांबता यात सक्रीयपणे उतरण्यासाठी चार टप्प्यात आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली.
गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन लेखक चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, प्रा. शरद गायकवाड,राजाभाऊ शिरगुप्पे, शिवाजीराव परुळेकर, किसन कुराडे, संजय सौंदलगे यांनी साहित्यीकांच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.
असे असणार आंदोलनाचे टप्पे
- पहिला टप्पा: अन्यायकारक कायदे मागे घेऊन अन्नदात्याला न्याय देण्याची मागणी देणारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
- दुसरा टप्पा: कोल्हापुरातील सर्व साहित्यीक राष्ट्रीपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती करणार
- तिसरा टप्पा: शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहून पंतप्रधानांना पाठवणार
- चौथा टप्पा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार
हे साहित्यीक होणार सहभागी
डॉ. सुनिलकुमार लवटे, चंद्रकुमार नलगे, आप्पासो खोत, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. राजन गवस, राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. शरद गायकवाड, डॉ. रविद्र ठाकूर, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. रणधीर शिंदे, प्रा.गोमटेश पाटील, राजन कोनवडेकर, महावीर कांबळे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अरुण शिंदे, प्रा. ए.डी.कुंभार, रमेश जाधव, संजय खोचारे, रविंद्र गुरव, एकनाथ पाटील, गोविंद पाटील, शाम कुरळे, रा.तू.भगत, रजनी हिरळीकर, अशोक पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, चंद्रकांत निकाडे, जीवनराव साळोखे, डॉ. मारुती गुरव, विश्वास सुतार, परशराम आंबी, निलम माणगावे, राजंद्र पाटील, मनोहर मोहिते, संजय मगदूम, संजय सौंदलगे, डॉ. राजेंद्र कुंभार, दिनकर पाटील, सुभाष विभुते, बा.स.जठार, टी.आर.गुरव, जुई कुलकर्णी.